पुणे

रेल्वे प्रवासात तीन मोबाइल लंपास

CD

दौंड, ता. ३ : बिदर-मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस आणि नांदेड-पनवेल एक्सप्रेसमधील तीन प्रवाशांचे एकूण तीन मोबाइल चोरीस गेले आहेत. पहिली चोरी रविवारी (ता. १) बिदर-छत्रपती शिवाजी महाराज मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये झाली. धाराशिव ते मुंबई असा वातानुकूलित डब्यातून प्रवास करणारे मोहमंद शकील अन्सारी (वय ६१, रा. अंधेरी-कुर्ला रस्ता, मुंबई) यांचा मोबाइल बार्शी ते दौंड रेल्वे स्थानक दरम्यान चोरीस गेला. दुसरी चोरी नांदेड-पनवेल एक्सप्रेसमध्ये सोमवारी (ता. २) झाली. किशन महादेव जाधव (वय २१, रा. परळी वैजनाथ, जि. बीड) हे आईसह परळी ते दौंड असा आरक्षित डब्यातून प्रवास करीत होते. प्रवासाच्या दरम्यान दौंड रेल्वे स्थानक येण्यापूर्वी त्यांना त्यांचा व त्यांच्या आई यांचा मोबाइल चोरीस गेल्याचे लक्षात आले. दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्यात या प्रकरणी दाखल दोन स्वतंत्र फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भावाशी बोललो! इस्रायल इराण युद्धानंतर पीएम मोदींचा आखाती देशांच्या प्रमुखांना कॉल, काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update: सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीला

Leopard Caught : नागापूर येथे एका महिन्यात चार बिबटे जेरबंद

Iran War: इराण-इस्रायलच्या लढाईत भारताला फटका! चार दिवसांत मोठं आर्थिक नुकसान, धक्कादायक आकडेवारी समोर

IND vs ENG: चंद्रग्रहणात सराव... नको रे बाबा! भारतीय संघाने वानखेडेवरील सरावाची वेळ बदलली, सूर्याच्या संघाने 'ती' वेळ टाळली

SCROLL FOR NEXT