पुणे

दौंडमध्ये भाजपने साधला समतोल

CD

दौंड, ता. ९ : दौंड पंचायत समितीच्या सभापतिपदी सुखदेव सोनबा चोरमले व उपसभापतिपदी अमृता अभिमन्यू गिरमकर यांची बिनविरोध निवड झाली. पंचायत समितीच्या स्थापनेनंतर प्रथमच भाजपच्या उमेदवारांची सभापती व उपसभापतिपदावर निवड झाली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील खामगाव गणातून निवडून आलेले चोरमले यांना सभापतिपदावर; तर तालुक्याच्या पूर्व भागातील देऊळगाव राजे गणातून निवडून आलेल्या गिरमकर यांना उपसभापतिपदावर संधी देत समतोल साधण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला आहे.
दौंड शहरातील पंचायत समिती सभागृहात सोमवारी (ता. ९) झालेल्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या. पीठासीन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी रेवणनाथ लबडे यांनी काम पाहिले. सभापतिपदासाठी भाजपकडून सुखदेव सोनबा चोरमले (खामगाव गण) व राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रवीण किसन दिवेकर (वरवंड गण ) यांनी अर्ज दाखल केले होते. उपसभापतिपदासाठी अमृता अभिमन्यू गिरमकर (देऊळगाव राजे गण) व राष्ट्रवादी काँग्रेसकडून मनीषा संतोष ताकवणे (पारगाव गण) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. दरम्यान प्रवीण दिवेकर व मनीषा ताकवणे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सभापती व व उपसभापतिपदावर अनुक्रमे सुखदेव चोरमले व अमृता गिरमकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी यांनी जाहीर केले.
दौंड पंचायत समितीचे सभापतिपद हे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. चौदा सदस्यीय पंचायत समिती भारतीय जनता पक्षाचे ८ व रष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ६ सदस्य, असे बलाबल आहे. तालुक्यातील १४ गणांपैकी नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव असलेल्या राहू गणातून निवडून आलेल्या भाजपच्या उमेदवार शुभांगी किसन शिंदे, खामगाव गणातून निवडून आलेले सुखदेव सोनबा चोरमले व यवत गणातून निवडून आलेल्या तेजस्विनी दत्ता पडळकर यांच्यात सभापतिपदासाठी चुरस होती. पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या निर्णयानुसार सुखदेव चोरमले यांची या पदासाठी निवड करण्यात आली. निवडीनंतर आमदार राहुल कुल यांच्या हस्ते सभापती चोरमले यांचा, तर भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात यांच्या हस्ते उपसभापती गिरमकर यांचा सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table मध्ये उलथापालथ; राजस्थानचा नेट रन रेट घसरला, CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळा

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

SCROLL FOR NEXT