पुणे

जिद्द, परिश्रम आणि स्वप्नपूर्ती

CD

दौंड, ता. १० : सर्विसेस सिलेक्शन बोर्डाच्या परीक्षत सात वेळा अपयश आल्यानंतरही खचून न जाता लष्करी अधिकारी होण्याचे स्वप्न गिरीम (ता. दौंड) येथील युवकाने मोठ्या जिद्दीने पूर्ण केले आहे. कुटुंबीयांचे पाठबळ, अपार परिश्रम आणि ध्येय गाठण्यासाठीची विलक्षण सहनशक्ती असलेल्या अभिजित पोपट फुलारी या शेतकरी पुत्राने २८१ प्रशिक्षणार्थ्यांमध्ये नवव्या क्रमांकाला गवसणी घालत लेफ्टनंट पद संपादित केले आहे. त्यामुळे त्याचे परिसरातून कौतुक होत आहे.
अभिजित हा गया (बिहार) येथील ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी येथे पार पडलेल्या दीक्षांत संचलनानंतर भारतीय सशस्त्र दलात लेफ्टनंट पदावर रुजू झाला आहे. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी या दीक्षांत संचलनाची मानवंदना स्वीकारली व या संचलनातील एका तुकडीचे नेतृत्व अभिजित याने केले होते.
अभिजित यांचे प्राथमिक शिक्षण दौंड शहरातील शिशू विकास मंदिर व माध्यमिक शिक्षण शहरातील शेठ ज्योतिप्रसाद विद्यालयात झाले. पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात उच्च माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर श्रीमती काशीबाई नवले महाविद्यालयात यांत्रिक अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. त्याला लष्कराविषयी आकर्षण होते व त्यासाठी त्याने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची प्रवेश परीक्षा दिली पण त्यात अपयश आले. राष्ट्रीय छात्र सेना आणि राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सक्रिय सहभाग घेतला.
दरम्यान, ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमीसाठी अभियांत्रिकी शिक्षणाच्या आधारे थेट तांत्रिक निवड होण्यापूर्वी अभिजित याला पाच दिवसांची दीर्घ मुलाखत आणि त्यानंतर पाच दिवस चालणारी वैद्यकीय चाचणी पूर्ण केल्यानंतर प्रवेश मिळाला. अखिल भारतीय पातळीवर त्याचा त्या वेळी ५४ वा क्रमांक होता.
अभिजित याचे वडील पोपट फुलारी हे शेतकरी व वकील आहेत. सध्या ते दौंड वकील संघाचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. आई मनिषा फुलारी या गृहिणी आहेत. बंधू सुजित फुलारी हे वकील, तर बहीण श्रद्धा मांडकर या कृषी सेविका आहेत.

माझे अजोबा दिवंगत जगन्नाथ मारुती फुलारी हे आम्हाला नेहमी मोठे स्वप्न बघण्यास सांगायचे. आम्ही अधिकारी व्हावे, असे त्यांना नेहमी वाटायचे. त्यांचे स्वप्न पूर्ण झाले पण ते पाहण्यासाठी ते हयात नाहीत. सात वेळा अपयश आले तरी कुटुंबीयांनी कधीही तू काहीतरी दुसरे बघ, असे सांगितले नाही. उलट मला आधार दिला. त्यांचे पाठबळ, मित्रांचे सहकार्य आणि स्वयं अध्ययनाने हे यश संपादित करता आले.
- अभिजित फुलारी

04522

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: यंदाही मुंबईची तुंबई! ८० ठिकाणी भरणा-या पाण्याचा उपसा करण्यासाठी ५४७ पंप बसविणार

Nita Ambani: नीता अंबानींच्या घरात रोज बनतात तब्बल ४००० पोळ्या! कारण ऐकून तुम्हालाही बसणार नाही विश्वास; Viral

Latest Marathi News Live Update: बेंगळुरुमध्ये मुसळधार पावसाची हजेरी

Missing Link: खंडाळा घाटातील ट्रॅफिक, अपघात आणि विलंबाला ब्रेक... मेगा प्रोजेक्टला 'मिसिंग लिंक' हे नाव का? कोंडी पूर्णपणे संपेल का?

महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईत भव्य परेड! कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीत बदल आणि कडक निर्बंध लागू; कुठे अन् कधी?

SCROLL FOR NEXT