पुणे

केडगाव बाजारात ज्वारीची आवक घटली

CD

दौंड, ता. ११ : दौंड तालुक्यातील केडगाव उपबाजारात ज्वारीची आवक घटली असून बाजारभावात प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल तब्बल ४३० रुपयांची वाढ झाली आहे. ज्वारीची ३०३ क्विंटल आवक झाली असून, त्यास किमान २००० तर कमाल ५५३० रुपये क्विंटल असा बाजारभाव मिळाला आहे.

दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारात व यवत येथील उपबाजारात भुसार मालाची आवक व बाजारभाव स्थिर आहे. केडगाव उपबाजारात भुसार मालाची आवक स्थिर असून बाजारभावात तेजी आहे. पाटस येथील उपबाजारात भुसार मालाची आवक वाढली असून बाजारभाव स्थिर आहे. दौंड मुख्य बाजारात पालेभाज्यांची आवक व बाजारभाव स्थिर आहे.
दौंड मुख्य बाजारात कोथिंबिरीची १०१६० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान २०० तर कमाल ८०० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला. मेथीची ४३०० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान २०० तर कमाल ८०० रुपये जुडी, असा बाजारभाव मिळाला.
उन्हाचा कडाका वाढल्याने लिंबाला मागणी वाढली आहे. आवक कमी असल्याने बाजारभाव कडाडले आहेत. केडगाव उपबाजारात लिंबाची ५२ क्विंटल आवक झाली व त्यास प्रतवारीनुसार किमान ८०० तर कमाल २०५२ रुपये असा बाजारभाव मिळाला.

तालुक्यातील एकूण शेतमालाची आवक व बाजारभाव :
* शेतमाल आवक किमान कमाल
(क्विंटल) (रु.) (रु.)
गहू १०४६ २००० २८०१
ज्वारी ०३१० २००० ५५३०
बाजरी ०१६८ १९०० ३५००
हरभरा ०१०३ ४००० ५२००
उडीद ०००६ ५५०० ६७१०
तूर ००५१ ५७०० ७१७०
मका ००७८ १६५० १८५०


बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रति दहा किलोसाठीचे कमाल दर) : बटाटा-१४०, आले-५००, गाजर-२५०, पेरू-२००, काकडी -१६०, भोपळा-१५०, कोबी-१००, फ्लॅावर-२१०, टोमॅटो-१७५, हिरवी मिरची-९००, भेंडी- ६००, कार्ली-६००, दोडका- ४००, वांगी-३००, लिंबू-१०००, कलिंगड-१५०, खरबूज २५०.

दोडका, वांगी व मिरचीच्या दरात घट
दौंड मुख्य बाजारात दोडक्याची २५ क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलोसाठी किमान १०० तर कमाल ४०० रुपये, असा दर मिळाला. वांगीची ४२ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिदहा किलोसाठी किमान १०० तर कमाल ३०० रुपये असा दर मिळाला.

कांद्याच्या दरात वाढ
केडगाव उपबाजारात कांद्याची आवक घटली असून बाजारभावात प्रतिक्विंटल ४०० रुपयांची वाढ झाली आहे. कांद्याची १४९२७ क्विटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान २०० तर कमाल १५०० प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT