पुणे

दौंडमध्ये सिलिंडरसाठी गर्दी न करण्याचे आवाहन

CD

दौंड, ता. १२ : दौंड तालुक्यात घरगुती वापराच्या गॅस सिलिंडर नोंदणीसाठी अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन महसूल प्रशासनाने केला आहे. तालुक्यात गॅस सिलिंडरचा तुटवडा नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
दौंडचे तहसीलदार अरुण शेलार यांनी गुरुवारी (ता. १२) एका प्रसिध्दीपत्रकाराद्वारे हे आवाहन केले आहे. दौंड तालुक्यात हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड, भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड व इंडियन आॅईल कार्पोरेशन लिमिटेड या तीन सरकारी कंपन्यांचे ११ वितरक आहेत. सध्या तालुक्यात घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरचा तुटवडा नाही. त्यामुळे गॅस ग्राहकांनी गॅस वितरकांच्या दुकानांसमोर अनावश्यक गर्दी टाळावी. पेट्रोल व डिझेलचा देखील पुरेसा साठा उपलब्ध असल्याने नागरिकांनी पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन केले आहे.
गॅस कंपनीच्या ऑनलाइन प्रणालीद्वारे ग्राहकांनी घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची नोंदणी करावी. कंपनीकडून पुरवठा नियमित आहे. नोंदणीनंतर विहित कालावधीत १ ते ३ दिवसांत पुरवठा केला जात आहे, अशी माहिती गॅस वितरक नितीन ओझा यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून गॅस सिलिंडरचा काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी विशेष दक्षता पथके नेमण्यात आले आहे. दौंड तालुक्यात गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्यांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियमातील कलमान्वये दंडात्मक व फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा तहसीलदार अरुण शेलार यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table मध्ये उलथापालथ; राजस्थानचा नेट रन रेट घसरला, CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळा

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

SCROLL FOR NEXT