पुणे

धावत्या रेल्वेच्या खिडकीतून महिलांचे मंगळसूत्र हिसकावले

CD

दौंड, ता. १७ : गोंदिया- कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या दोन ज्येष्ठ महिला प्रवाशांचे मंगळसूत्र हिसकावण्यात आले. धावत्या गाडीच्या खिडकीतून हात घालून हे मंगळसूत्र हिसकावण्यात आले.
शशिकांत शंकर जोशी (वय ७०, रा. दत्तवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) हे शनिवारी (ता. १४) महाराष्ट्र सुपरफास्ट एक्सप्रेसने शेगाव ते मिरज असा कुटुंबीयांसह प्रवास करीत होते. शेगाव येथे संत श्री गजानन महाराज यांचे दर्शन करून परतीच्या प्रवासादरम्यान आरक्षित डब्यात ही चोरी झाली. दौंड कॉर्ड लाइन रेल्वे स्थानकावरून एक्सप्रेस रवाना झाल्यानंतर मध्यरात्री सव्वादोन वाजण्याच्या सुमारास चोरट्याने धावत्या गाडीच्या खिडकीतून हात घालून झोपेत असलेल्या शशिकांत जोशी यांच्या पत्नी स्मिता जोशी यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. स्मिता जोशी यांना त्यांचे एक तोळा वजन असलेले सोन्याचे मंगळसूत्र हिसकावल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला. तेव्हा त्यांच्या समवेत प्रवास करणाऱ्या त्यांच्या नातेवाईक अमृता अरुण जोशी (रा. अंकली, ता. चिकोडी, जि. बेळगाव) यांच्या गळ्यातील एक तोळा वजन असलेले सोन्याचे मंगळसूत्रदेखील चोरीस गेल्याचे जोशी कुटुंबाच्या लक्षात आले.
याबाबत शशिकांत जोशी यांनी मिरज रेल्वे स्थानकावर चोरीसंबंधी तक्रार नोंदविल्यानंतर सदर चोरीचा गुन्हा तपासाकरिता दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्यात या प्रकरणी शनिवारी (ता. १४) अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: गॅसटंचाईमुळे ठाण्यातील ६० टक्के हॉटेल्स बंद, व्यावसायिकांचे चुलीवर स्वयंपाक करत आंदोलन

Pune Traffic: महाराष्ट्र केसरी स्पर्धेमुळे उद्यापासून पुण्याच्या वाहतुकीत बदल; लोणीकंद-खराडी मार्गावर अवजड वाहनांना बंदी

Maharashtra Heatwave: अलर्ट! राज्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता, उष्णतेची लाट ओसरली

Latest Marathi News Live Update : पोलिस भरती प्रक्रियेत उमेदवारांनी घातला गोंधळ

Pune Crime : सिंहगड रस्त्यावरील तरुणाच्या खून प्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT