पुणे

पक्षाच्या वाढीसाठी जगदाळे यांना संधी

CD

पुणे/दौंड, ता. १८ : उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा अजित पवार यांनी पक्षाच्या वाढीसाठी वीरधवल जगदाळे यांना अध्यक्षपदावर काम करण्याची संधी दिली आहे.
जगदाळे कुटुंबाचा दौंड शहर आणि तालुक्यातील राजकारणावर ठसा आहे. त्यांच्या पुतणी दुर्गादेवी जगदाळे या सध्या दौंडच्या नगराध्यक्ष आहे. पदवीधर असलेले वीरधवल जगदाळे हे २००७ ते २०१२ आणि २०१७ ते २०२२ या कालावधीत पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य होते. फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या निवडणुकीत दौंड तालुक्यातील खडकी- देऊळगाव राजे गटातून विजयी होत जिल्हा परिषदेच्या सभागृहात तिसऱ्यांदा प्रवेश केला. ते ‘बाबा’ नावाने ओळखले जातात.
प्रगतशील शेतकरी आणि दौंड गावाचे पाटील असलेले वीरधवल जगदाळे यांचा सन २०११मध्ये पुणे जिल्हा परिषदेचा ‘आदर्श जिल्हा परिषद सदस्य’ या पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. आलेगाव येथे २००८ मध्ये स्थापन झालेल्या दौंड शुगर लिमि़टेड या खासगी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक म्हणून काम पाहताना या कारखान्याचा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आलेला आहे. त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध झाल्याचे जाहीर होताच दौंड शहर व तालुक्यात फटाके वाजवून मोठा जल्लोष करण्यात आला.

वीरधवल जगदाळे यांची राजकीय कारकीर्द
नगरसेवक- दौंड नगरपालिका, नगराध्यक्ष- दौंड नगरपालिका, सदस्य- पुणे जिल्हा परिषद (तिसऱ्यांदा), संस्थापक संचालक- दौंड शुगर लिमिटेड, अध्यक्ष- पुणे जिल्हा परिषद.



सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थलपतीला विजय मिळाला पण सत्ता नाही! मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी कुणाशी हातमिळवणी करणार? राज्यात त्रिशंकू स्थिती

Assembly election results 2026 Update : आसामसह बंगालमध्ये कमळ फुललं, तामिळनाडुत थलपतीचा विजय तर केरळमध्ये पुन्हा काँग्रेस

Mamata Banarjee : ममता बॅनर्जींचा पराभव, सत्ता अन् आमदारकीही गेली; भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचा मोठा विजय

Mumbai News: धारावीतील गोंधळ संपणार? अनिर्णित म्हणजे अपात्र नाही, प्राधिकरणाचा स्पष्ट संदेश

Line Fire: सय्यदपुरात महावितरणची मुख्य तार तुटून रस्त्यावर भीषण आग

SCROLL FOR NEXT