पुणे

मोबाईल चोरणाऱ्या दोघांना पुण्यात अटक

CD

दौंड, ता. २२ : दौंड- इंदूर एक्सप्रेसमध्ये पोलिस भरतीसाठी आलेल्या उमेदवाराचे शैक्षणिक प्रमाणपत्र आणि मोबाईल चोरणाऱ्या दोघांना लोहमार्ग पोलिसांनी पुणे येथे अटक केली. महिला पोलिस अंमलदाराने दाखवलेल्या सतर्कतेमुळे या चोरट्यांना पकडण्यात यश आले.
राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक पाचच्या भरतीसाठी प्रतीक रमेश सूर्यवंशी (वय २४, रा. सांगली) हा युवक दौंडला आला होता. शुक्रवारी (ता. २०) तो दौंड- इंदूर एक्स्प्रेसने पुण्याकडे जात असताना, चोरट्यांनी त्याची सॅकबॅग लंपास केली. यात दहावी- बारावीची मूळ प्रमाणपत्रे आणि २० हजार रुपयांचा मोबाईल होता. बॅग चोरीला गेल्याचे लक्षात येताच प्रतीकने लोहमार्ग पोलिसांकडे धाव घेतली.
तांत्रिक विश्लेषणाद्वारे चोरीचा मोबाईल त्याच गाडीत असल्याचे हवालदार उमेश कोंगे यांच्या निदर्शनास आले. त्याच गाडीतून प्रवास करणाऱ्या महिला अंमलदार दिव्या आभाळे यांना तातडीने माहिती दिली. गाडी पुणे स्थानकावर पोहोचताच, आभाळे यांनी प्रवाशांच्या मदतीने लक्ष्मीकांत सजन कराड (वय ४३, रा. नाशिक) व सागर लक्ष्मण ठाकूर (वय २५, रा. वाशीम या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीचे साहित्य जप्त केले. प्रतीक याच्या फिर्यादीनुसार दोघांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी (ता. २१) दुपारी दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावतीत गॅस सिलिंडरचा गोलमाल; परस्पर बुकींग नंतर आता डिलिव्हरी न मिळताच आला मेसेज...

चार दिवसांनी निर्माण होणारा गजकेसरी योग 'या' चार राशींना करणार मालामाल ! आनंदाचे दिवस होणार सुरू

Ashadhi Wari: आषाढी वारीत तीन जिल्ह्यांतील सर्व पालखी मुक्कामी ‘जर्मन हॅंगर’; सोलापूरसह पुणे, सातारा जिल्ह्यातील निविदांचे अधिकार सीईओंना!

''होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यास तयार, पण...''; ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचा मोठा निर्णय

Junnar News : जुन्नरमध्ये इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT