पुणे

गाय वाहतुकीच्या संशयावरून मारहाण करणाऱ्यांविरूद्ध गुन्हा

CD

दौंड, ता. २८ : दौंड शहरात गायींची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचालकाला मारहाण करणाऱ्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गायी कत्तलीसाठी नेल्या जात असल्याच्या संशयावरून ही मारहाण झाली होती.
दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेम्पोचालक शाहरुख नूर शेख (रा. लोहियानगर, स्वारगेट, पुणे) हा शुक्रवारी (ता. २७) भरतगाव (ता. दौंड) येथून नऊ गाया घेऊन चापडगाव (ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) येथे निघाला होता. गायी विकत घेणारा एक जण व त्याचा मित्रदेखील टेम्पोत होते. दरम्यान, रात्री हा टेम्पो दौंड शहरातून अष्टविनायक मार्गाने न जाता वाट चुकल्याने शहरातील भाजी मंडईच्या दिशेने वळाला. तेथे पाच जणांनी हा टेम्पो अडवला. त्यांनी टेम्पोतील गाया कत्तलीसाठी नेल्या जात असल्याच्या संशयावरून चालकाला दमदाटी केली. वाद वाढून टेम्पोचालक व गायी विकत घेणाऱ्यांना दांडुके व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या टोळक्याने आपल्या खिशातील तेराशे रुपये काढून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे शाहरुख शेख याने दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.
या फिर्यादीनुसार दौंड पोलिस ठाण्यात रुद्राक्ष लवटे, सुरेश पालवे (दोघे रा. गोपाळवाडी, ता. दौंड), सोनू थोरात (रा. भाजी मंडई, दौंड), संकेत दळवी (रा. मोरे वस्ती, लिंगाळी, ता. दौंड) व एक अनोळखी तरूण, अशा पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT