दौंड, ता. २ : शहरात राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) भरती प्रक्रियेत उत्तेजक पदार्थांचे सेवन केल्याच्या संशयावरून गुरुवारी (ता. २) तीन उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांच्याकडे संशयास्पद पावडर आणि गोळ्या सापडल्याने ही कारवाई करण्यात आली.
एसआरपीएफ गट क्रमांक पाच येथे सशस्त्र पोलिस शिपाई पदाच्या १०४ जागांसाठी भरती सुरू आहे. मैदानी चाचणीदरम्यान तीन तरुणांकडे संशयास्पद पदार्थ आढळले. धावण्याच्या स्पर्धेत सरस कामगिरी करण्यासाठी त्यांनी हे सेवन केल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. संबंधित उमेदवारांनी मात्र ही केवळ ''प्रोटिन पावडर'' असल्याचा दावा केला आहे.
दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक गोपाळ पवार यांनी सांगितले की, उमेदवारांच्या रक्ताचे नमुने आणि जप्त केलेले पदार्थ प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. सध्या कोणताही गुन्हा दाखल नसून, प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. १०४ जागांच्या या भरतीसाठी २४,४३६ उमेदवारांनी अर्ज केले असून १६ मार्चपासून ही प्रक्रिया सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.