डोर्लेवाडी, ता.२८ : जलजीवन मिशन अंतर्गत डोर्लेवाडी (ता. बारामती) येथील पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजनेचे
हस्तांतरण मान्यवरांच्या हस्ते जल अर्पण करून करण्यात आले. या वेळी पाणी बचतीबाबत ग्रामस्थांनी शपथ घेतली.
जिल्हा परिषद पुणे पंचायत समिती बारामती ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांच्या वतीने मौजे डोर्लेवाडी येथे जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली होती. ही योजना पूर्ण झाल्याने प्रशासनाच्या वतीने गुरुवारी (ता. २६) जल अर्पण करून हस्तांतर करण्यात आली. यावेळी पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी नंदन जरांडे, पाणीपुरवठा विभागाच्या उप अभियंता अश्विनी मेश्राम, पंचायत समितीचे माजी सभापती अशोक नवले, डॉ. प्रतिभा नेवसे, खरेदी विक्री संघाचे संचालक ज्ञानदेव नाळे, माजी संचालक भगवान क्षीरसागर, शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्त डॉ. मोहन नेवसे, छत्रपती कारखान्याचे संचालक नितीन मासाळ, माजी संचालक रमेश मोरे, सरपंच सुप्रिया नाळे, उपसरपंच सुनील म्हेत्रे, ग्रामपंचायत सदस्य सचिन निलाखे, राणी नेवसे, छबुबाई मदने, विद्या काळकुटे, सुमित्रा वामन, रेखा नाळे, निवृत्ती नेवसे, मनोज नाळे, अजित वामन, राहुल कालगावकर, सुनील माने आदींसह उपस्थित होते.
स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून व श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. गाव पातळीवर राबवण्यात आलेल्या योजनेची माहिती तसेच योजनेपासून ग्रामस्थांना झालेला फायदा, पाणी बचतीचे महत्त्व याची माहिती प्रास्ताविकात सोमनाथ भिले यांनी दिली. त्यानंतर प्राथमिक शाळा व न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक विद्यालयाच्या मुलांनी जल जीवन योजना व पाणी बचती विषयी जनजागृती पर घोषणा देत प्रभात फेरी काढली. ज्या ठिकाणी नळ जोड देण्यात आली होती. त्या ठिकाणी जाऊन मान्यवरांनी जलपूजन केले. आरोग्य सेवक यांनी पाण्याची गुणवत्ता तपासणी केली. यासहाय्यक गटविकास अधिकारी नंदन जरांडे, निवृत्ती नेवसे, मनोज नाळे यांनी मनोगत व्यक्त केले.
00590
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.