पुणे

डोर्लेवाडीत गुलाल, पुष्पाचा वर्षाव

CD

डोर्लेवाडी, ता. ५ : ‘टाळ मृदंगाच्या निनादात हरिनामाचा अखंड गजर सुरु झाला... अन पुंडलिक वरदा हरी विठ्ठलचा जयघोष होताच भाविकांनी जड अंतकरणाने श्रींच्या मूर्तीवर गुलाल, पुष्प वर्षाव करून डोर्लेवाडी (ता. बारामती) येथे संत तुकाराम बीजेचा सोहळा साजरा केला.
तुकाराम महाराज मंदिर परिसरात आज भाविकांनी ‘याची देही याची डोळा’ बीजेचा सोहळा अनुभवला. देवस्थान समिती व सांप्रदायिक भजनी मंडळाच्या वतीने बीज उत्सव सोहळ्यानिमित्त ६७ वा कीर्तन महोत्सव घेण्यात आला. शैला यादव, बाळासाहेब नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली टाळ मृदंगाच्या गजरात गाथा पारायण झाले. सप्ताहात भागवत शिंदे, शांता बोराटे, माउली नवले, राजेंद्र कंडरे, दत्तात्रेय घुले, विजय शेंडे, शैला यादव यांची प्रवचने झाली. तसेच कीर्तन महोत्सवात शरद काळे, रोहिदास शास्त्री, सुनील निवंगुणे, समाधान पगार, एकनाथ गोळेसर, जयंत गोसावी यांची कीर्तने झाली.
आज पहाटे मंदिरात फुलांची सजावट करण्यात आली होती. सकाळी महाभिषेक झाल्यानंतर बाळासाहेब नाळे यांचे प्रवचन झाले. त्यानंतर लक्ष्मण कोकाटे यांचे बीजेनिमित्त फुलाचे कीर्तन झाले. दुपारी १२ वाजता अखंड हरिनामाचा गजर झाला. त्याच बरोबर अत्यंत जड अंतकरणाने भाविकांनी गुलाल, पुष्प वर्षाव करून बीजेचा सोहळा साजरा केला. दुपारी भजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर टाळ मृदंगाच्या गजरात दिंडी मिरवणूक काढण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs ENG SF: संजू सॅमसनची वादळी अर्धशतक! गौतम, रोहित, विराटच्या विक्रमाशी बरोबरी; इशानसह ९७ धावा जोडल्या

बीएमसी जिंकताच भाजपची मोठी चाल! मुंबईत ८१ सदस्यीय नवी फौज तयार; टीममध्ये उत्तर भारतीयांचा बोलबाला, कुणाकडे कोणती जबाबदारी?

आपला स्वतःचा चित्रपट आहे असं समजून... आगामी 'राजा शिवाजी' चित्रपटाबद्दल काय म्हणाला रितेश देशमुख

Phulambri News : सुवर्ण महोत्सवी सप्ताहात नामस्मरणाचा अखंड गजर, शेलगाव खुर्द येथे हजारो भाविकांची उपस्थिती; काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता

Kej Bus Accident : केज-कळंब रोडवर एसटी बसचा भीषण अपघात; चालक-वाहकासह १३ प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT