डोर्लेवाडी, ता. २६ : भारत सरकारच्या गृह विभागामार्फत दिले जाणारे अति उत्कृष्ट सेवा पदक डोर्लेवाडी (ता. बारामती) येथील व सध्या सातारा येथे कार्यरत असणारे पोलिस निरीक्षक राजेंद्र वसंत शिंदे यांना प्रदान करण्यात आले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त साताऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ध्वजवंदन कार्यक्रमात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते हे पदक प्रदान करण्यात आले. यावेळी पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे आणि जिल्हाधिकारी संतोष पाटील उपस्थित होते.
शिंदे हे सध्या पोलिस मोटार परिवहन विभाग, सातारा येथे कार्यरत आहेत. ते मूळचे बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील रहिवासी आहेत. २७ जानेवारी १९९४ला ते पोलिस दलात भरती झाले. या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत त्यांनी दौंड, अहिल्यानगर, नाशिक ग्रामीण, छत्रपती संभाजीनगर, रायगड, पुणे आणि सोलापूर ग्रामीण या ठिकाणी सेवा बजावली आहे.
कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिक सेवेबद्दल त्यांना आजवर २००हून अधिक बक्षिसे मिळाली आहेत. विशेषतः मोटार परिवहन विभागात त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन केंद्र शासनाने त्यांना अति उत्कृष्ट सेवा पदकाने सन्मानित केले आहे. ही सेवा बजावत असताना त्यांना त्यांच्या पत्नी राणी राजेंद्र शिंदे यांची मोलाची साथ लाभली. राजेंद्र शिंदे यांना अति उत्कृष्ट सेवा पदकाने सन्मानित केल्यानंतर डोर्लेवाडी परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. अनेकांनी त्यांचा सत्कार देखील केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.