पुणे

देऊळगाव राजे येथे विजेचा खेळखंडोबा

CD

देऊळगाव राजे, ता.१८ : देऊळगाव राजे (ता.दौंड) येथील वीज उपकेंद्रातील रोहित्र जळाल्यामुळे शेतकऱ्यांना खंडित व अपुऱ्या प्रमाणात शेतीपंपांना वीजपुरवठा होत आहे. यामुळे पाण्याअभावी पिके सुकू लागली आहेत. सततच्या विजेच्या खेळखंडोबामुळे शेतकऱ्यांत संतापाची लाट उसळली आहे. महावितरण कंपनीने नवीन रोहित्र बसवून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा त्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे. देऊळगाव राजे गावामध्ये ३३/११ केव्हीचे वीज उपकेंद्र आहे. यातून देऊळगाव राजेसह वडगाव दरेकर,पेडगाव, शिरापूर, हिंगणीबेडी या गावांना वीजपुरवठा केला जातो. मागील महिन्यापासून शेतीपंपाना वीजपुरवठा खंडित व अतिरिक्त भारनियमन करून केला जात होता. त्यातच तीन दिवसापूर्वी उपकेंद्रातील दहा रोहित्र जळाले. यामुळे महावितरणने तात्पुरते पाचचे (एमव्हीए) रोहित्र बसवून सहा तास शेतीपंपाना वीजपुरवठा सुरू केला; परंतु गेली तीन दिवस झाले सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना चार तासही शेतीपंपांना वीजपुरवठा होत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

पिके कशी जगवावीत असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला आहे. दरम्यान, नित्याच्या खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतकरी उपकेंद्रातील कार्यालयात जाऊन कर्मचारी व महाविरणच्या अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त करीत आहेत. महावितरणचे अधिकारी मात्र नवीन रोहित्र कधी येईल हे स्पष्टपणे सांगत नाहीत. त्यातच पावसानेही ओढ दिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

दहा ते बारा दिवसात दहा एमव्हीएचे नवीन रोहित्र बसविण्यात येईल. सध्या बसविलेल्या रोहित्रावरुन दररोज सहा तास सुरळीतपणे शेतीपंपांना वीजपुरवठा करण्यात येईल. .
- महेश धाडवे, उपअभियंता, दौंड

गेली तीन दिवस झाले शेतीपंपांना वीजपुरवठा होत आहे. यातूनही खंडित पुरवठा होत आहे. सध्या पावसानेही ओढ दिली आहे. पिकांना वेळेवर पाणी मिळण्यासाठी तातडीने नवीन रोहित्र बसवून, सहा तास सुरळीत वीजपुरवठा करावा.
- संदीप हडगळे, शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT