देऊळगाव राजे, ता.७ : मागील वर्षी शेतकऱ्यांनी गर्वी कांद्याला वर्षभर चांगला बाजारभाव मिळाला. अधिक उत्पन्न मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी कांदा लागवडीस प्राधान्य दिले आहे.
परिणामी यंदा लागवडीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. यामुळे तालुक्यात ६० ते ७० टक्के कांद्याच्या लागवडी पूर्ण झाल्या आहेत.
सध्या कांद्याच्या लागवडींना वेग आला आहे.
दौंड तालुका हा उसाचा आगर म्हणून ओळखला जातो. परंतु सातत्याने शेतामध्ये उसाचे पीक घेतल्याने उत्पादनात मोठी घट झाल्याचे दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी शेतामध्ये मिश्र पीक घेऊन पीक पद्धतीमध्ये बदल केला आहे. मागील वर्षी कांद्याला २० रुपयांपासून ८० रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. यामुळे शेतकऱ्यांचे एकरी किमान ४ ते ६ लाख रुपये झाले. काही शेतकऱ्यांना नोव्हेबर मध्ये ६० ते ८० रुपयापर्यंत प्रतिकिलोला बाजारभाव मिळाला. मागील वर्षी कांद्याला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी कांद्याला लागवडीमध्ये वाढ केली असून नवीन शेतकऱ्यांनीही कांदा लागवड केली आहे.
जानेवारीअखेरपर्यंत कांदा लागवड सुरू राहणार आहे. परंतु चालुवर्षी लागवडीच्या मजुरीमध्ये वाढ झाली आहे. सध्या वाफाकांदा एकरी १२ ते १४ तर गादीवाफा १५ हजार एकर लागवड सुरू आहे तर काहींनी ट्रॅक्टर यंत्राच्या साहयाने लागवड केली आहे. केलेल्या कांद्यावर मुळकुज, पिळ, मावा अशा रोगांचा प्रार्दुभाव झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. मुळकुज या रोगामुळे काही शेतकऱ्यांना कांद्याची दुबार लागवड करावी लागत आहे. यामुळे उत्पादनात फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कांद्याला ५० रुपये हमीभाव मिळावा
कांद्याचे उत्पादन घेताना खर्चात मोठी वाढ झाली आहे. मजुरी, खते, औषधे यांचे भाव वाढत चालले आहेत. परिणामी खर्च वाढत आहे. यामुळे इतर पिकांप्रमाणे शासनाने कांद्यालाही प्रतिकिलोला किमान ४५ ते ५० रुपयांचा हमीभाव घावा..
- नीलेश अंकुश आवचर, प्रगतशील कांदा उत्पादक शेतकरी,
शेतकरी कांदा चाळीमध्ये साठवणूक करतात. परंतु कांदाचाळ करणे सर्वच शेतकऱ्यांना करणे शक्य होत नाही. शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने कांदाचाळी ड्रॉ पद्धतीने निवड करून अनुदान दिले जाते. परंतु बांधण्यासाठी अनेक जाचक अटी घालण्यात आलेल्या आहेत. तसेच कांदाचाळ लवकर मंजुरही होत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना साठवणुकीसाठी अडचणी येत आहेत. शासनाने कांदाचाळीचे उद्दिष्ट वाढवून त्यामधील जाचक अटी रद्द कराव्यात.
- संदीप नय्यर, प्रगतशील कांदा उत्पादक शेतकरी
00320
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.