देऊळगाव राजे, ता.१६ : बोरीबेल (ता. दौंड) ग्रामपंचायतीमध्ये येत असलेल्या गाडेवाडीला आता स्वतंत्र गावाचा दर्जा मिळाला आहे. याबाबतचे परिपत्रक नुकतेच शासनाने जारी केले आहे. यामुळे गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याला ( पाठपुराव्याला ) ग्रामस्थांना यश आले.
गाडेवाडीला साधारपणे १९९० मध्ये महसुली गाव म्हणून स्वतंत्र दर्जा मिळाला होता.परंतु गाडेवाडी, खोमणेवस्ती, शिंगाडेवाडी, सांळुकेवस्ती हा भाग बोरीबेल ग्रामपंचायतमध्ये मोडत होता. यामुळे महसुली गावाप्रमाणे गाडेवाडीला बोरीबेल ग्रामपंचायतीमधून वगळून स्वतंत्र गावाचा दर्जा देण्याची मागणी वेळोवेळीचे पदाधिकारी व ग्रामस्थ शासनाकडे करीत होते. यासाठी वेळोवेळी ग्रामसभा घेतल्या होत्या. अखेर सहा फेब्रुवारी २०२५ रोजी शासनाने निर्णय घेऊन गाडेवाडीला स्वतंत्र गाव म्हणून घोषित केले आहे.
गावामध्ये परिसरातील शिंगाडेवाडी, खोमणेवस्ती, साळुंकेवस्ती असा परिसर येत आहे. या वस्त्यावर सुमारे अडीच हजार लोकसंख्या आहे. गाडेवाडीला स्वतंत्र गावाचा दर्जा मिळाल्याबद्दल माजी सरपंच ज्ञानेश्वर जगताप, दत्तात्रेय जेडगे, कुंडलिक निकम, संभाजी गावडे, हनुमंत गाडे, शहाजी सावंत, राजश्री जेडगे, हिराबाई आटोळे, चंद्रकांत आवचर, रामचंद्र भोसले यांनी ‘सकाळ’शी बोलताना समाधान व्यक्त केले.
गाडेवाडी हे स्वतंत्र गाव झाल्यामुळे विकासाचा अनुशेष भरून निघेल.तसेच खऱ्या अर्थाने विकासाला निश्चितपणे गती येईल. दरम्यान, गेल्या अनेक वर्षाच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
- संभाजी गावडे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, बोरीबेल ग्रामपंचायत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.