देऊळगाव राजे, ता. १८ : तालुक्यातील दौंड पंचायत समितीच्या शिक्षण विभागामध्ये उपशिक्षक व पदवीधर शिक्षकांची तब्बल ५६ पदे रिक्त आहेत. तसेच मुख्याध्यापकासह अनेक महत्त्वाची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहे. शिक्षक व मुख्याध्यापकांच्या रिक्त पदामुळे विद्यार्थांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभागातील सर्व रिक्तपदे भरण्याची मागणी ग्रामस्थांनी व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण २८९ प्राथमिक शाळा आहेत. सध्या वाढत्या इंग्रजी शाळांमुळे जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या कमी होताना दिसत आहे. यामुळे शासनाने शाळांमध्ये पटसंख्या वाढवण्यासाठी विविध उपक्रम विद्यार्थ्यांसाठी चालू करून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी शाळामध्ये लोकसहभागातूनही उपक्रम राबविले जात आहेत. एकीकडे गुणवत्ता व पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे मात्र काही शाळांना दोन वर्ष होऊनही उपशिक्षक, मुख्याध्यापक पटानुसार मिळालेले नाहीत. यामुळे शिक्षकांना अतिरिक्त वर्गाचे अध्यापनाचे काम करावे लागत आहे. तसेच मुख्याध्यापक नसल्यामुळे कार्यरत असलेल्या उपशिक्षकाला वर्गात शिक्षणाबरोबर मुख्याध्यापकांचे प्रशासकीय कामाचा ताण पडत आहे.
शासनाला वेळोवेळी माहिती पुरवून प्रशासकीय सभांना उपस्थित राहावे लागत आहे. यामुळे अध्यापनाला कमी वेळ मिळत आहे. याचा शासनाने गांभीर्याने विचार करून शिक्षण विभागातील रिक्त पदे भरण्याची मागणी पालक करीत आहेत.
तालुक्यात रिक्त असलेली पदे
पदाचे नाव मंजूर कार्यरत रिक्तपदे
उपशिक्षक ८०३ ७७२ ३१
पदवीधर १३५ ११० २५
मुख्याध्यापक ४१ १६ २५
केंद्रप्रमुख २० ०८ १२
वि.अधिकारी ०४ ०२ ०२
पटसंख्या वाढविण्यासाठी सुरू असलेले उपक्रम ः
मोफत पाठ्यपुस्तके व सर्वांना गणवेश वाटप.
शाळा पूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन.
पटनोंदणी पंधरवडा व नवगंटाचे स्वागत.
जिल्हा परिषद शाळामध्ये सेमी इंग्रजी माध्यमाची सुरवात.
प्रधानमंत्री शालेय पोषण आहार योजनेत १५ प्रकारच्या पाककृतीचा समावेश.
इंग्रजी अध्ययन समृद्धी कार्यक्रम.
निपुण भारत अंर्तगत भाषा व गणित विषय क्षमता वृद्धी कार्यक्रम.
पुढील शैक्षणिक वर्षापासून सीबीएससी पॅटर्नची पहिलीपासून सुरवात करणे.
हिंगणीबेर्डी (गावठाण) येथे पहिली ते चौथीपर्यंतची शाळा असून ३२ पटसंख्या आहे. गेल्या दोन वर्षापासून एक शिक्षक देण्याची मागणी केली आहे. याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. परंतु दोन वर्ष होऊनही शाळेला दुसरा उपशिक्षक मिळालेला नाही. सध्याच्या शिक्षकाला विद्यार्थांच्या अध्यापना बरोबर मुख्याध्यापकांचेही काम पहावे लागत आहे. यामुळे शाळेला दुसरा शिक्षक मिळावा.
-हरिभाऊ भोसले अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, हिंगणीबेर्डी
मुख्याध्यापक पदोन्नती लवकरच वरिष्ठ कार्यालयाकडून होणार आहे. तोपर्यंत शाळेतील ज्येष्ठ शिक्षकांकडे मुख्याध्यापक पदाचा पदभार देण्यात आलेला आहे. तसेच रिक्त शिक्षक पदाबाबत जिल्हा परिषदेला माहिती देण्यात आली आहे.
-संजय महाजन, गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती, दौंड.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.