पुणे

भांडण मिटवायला गेलेल्या दौंड पोलिसांवरच हल्ला

CD

देऊळगाव राजे, ता. १४ : आलेगाव- धुमाळवस्ती येथे घरगुती भांडणे मिटविण्यासाठी गेलेल्या दौंड पोलिसांना दोन जणांनी जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
या प्रकरणी दौंड पोलिसांनी कांतिलाल रघुनाथ भोकारे व अशोक रघुनाथ भोकारे (दोघेही रा. आलेगाव धुमाळवस्ती) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत दौंड पोलिस ठाण्यात नजीर गफुरभाई तांबोळी (नेमणूक- दौंड पोलिस ठाणे) यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, ‘११२’ या पोलिस मदत क्रमांकावर संपर्क साधल्याने पडताळणी करण्यासाठी नजीर तांबोळी व सोबत पोलिस कॉन्स्टेबल बी. जी. येणारे हे सरकारी वाहनाने धुमाळवस्ती येथ गेले. तेथे पोचल्यावर कांतिलाल व अशोक भोकरे यांनी, ‘तुम्ही पोलिस, आमच्या घरगुती भांडणात का पडता?’ असे म्हणून त्यांना शिवीगाळ केली.त्यानंतर, ‘तुमची नोकरीच घालून टाकतो,’ अशी अशी धमकी देत, ‘आम्ही कोण आहे, ते तुम्हाला दाखवतोच,’ अशी पुन्हा धमकी देत पोलिसांच्या अंगावर धावून आले. त्यावेळी अशोक भोकारे याने नजीर यांच्या अंगावरील गणवेशाचा शर्ट धरून त्यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी पाठीत व पोटात मारहाण केली. तसेच, कांतीलाल भोकारे याने हातात लोखंडी कोयता घेऊन येणारे यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. नजीर यांच्या फिर्यादीनुसार दौंड पोलिसांनी दोघांवर गुरूवारी (ता. १३) गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार महेंद्र लोहार करीत आहे.
दरम्यान, पोलिसांनी दोन्ही संशयितांना गुरुवारी अटक करून दौंड न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना १५ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT