पुणे

खोरवडीत बंधाऱ्याच्या पाणी पातळीत घट

CD

देऊळगाव राजे, ता.४ : देऊळगाव राजे व खोरवडी (ता.दौंड) येथील भीमा नदीवरील बंधाऱ्यातील पाण्याची पातळी घटली आहे. यामुळे भीमा नदी पात्रात भामा आसखेड धरणातून पाणी सोडण्याची मागणी दौंड व श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

दौंड तालुक्याच्या पूर्व भागामध्ये भीमा नदीवर देऊळगाव राजे व खोरवडी येथे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. बंधाऱ्यातील पाण्यावर शेतकऱ्यांची पिके अवंलबून आहेत. पाण्याचा फायदा दौंड व श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) तालुक्यातील शेतकऱ्यांना होत आहे. शेतामध्ये ऊस, कांदा, मका, उडीद यासह इतर पिके आहेत.
सध्या उन्हाळा असल्याने शेतीपंप सुरू आहेत. यामुळे दोन्ही बंधाऱ्यातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत चालली आहे. वडगाव दरेकर येथील लिफ्ट परिसरातील नदीचे पात्र कोरडे पडू लागले आहे.
धरणातून सोडलेले पाणी बंधाऱ्यापर्यंत येण्यास वेळ लागत आहे. शेतकऱ्याच्या उभ्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी होत आहे.

देऊळगाव राजे येथील बंधाऱ्यातील पाणीपातळी तळापर्यंत गेली आहे. पाणीटंचाई निर्माण न होण्यासाठी भामा आसखेड व इतर धरणातून भीमा नदीत पाणी आवर्तन सोडण्याची नितांत गरज आहे.
- ज्ञानेश्वर आवचर, माजी अध्यक्ष, देऊळगाव राजे विकास सोसायटी

00496

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Exit Poll: बंगालमध्ये राजकीय थरार! BJP बहुमताच्या उंबरठ्यावर, TMC ला मोठा फटका; 15 वर्षांनंतर सत्ताबदलाचा भूकंप

Exit Poll Predictions 2026 : पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि तामिळनाडूमध्ये कोणाची सत्ता येणार? 'एक्झिट पोल'चे धक्कादायक आकडे, ममता बॅनर्जींच्या बालेकिल्ल्याला सुरुंग?

Latest Marathi News Live Update: केरळमध्ये आमची बाजू कमकुवत असली तरीही भाजपचेच राज्य येईल - भाजप खासदार मनोज तिवारी

Nandur Sarpanch Election: दौंड तालुक्यातील नांदूर ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे विशाल थोरात सरपंचपदी विजयी; संतोष बबन बोराटे यांना धक्का

Assam Election Exit Poll : आसाममध्ये पुन्हा एकदा फुलणार कमळ! NDA ला 100 जागा मिळण्याचा अंदाज, काँग्रेसच्या स्वप्नांवर पाणी; पाहा कोणाला किती जागा?

SCROLL FOR NEXT