पुणे

देऊळगाव येथील ओढे, नाल्यांना पूर

CD

देऊळगाव राजे, ता. २५ : देऊळगाव राजे (ता. दौंड) व परिसरातील गावांमध्ये रविवारी जोरदार पाऊस झाला. सलग दोन दिवस झालेल्या मोठ्या पावसामुळे ओढे व नाल्यांना पूर आला आहे. आठ दिवसांच्या पावसामुळे खरीप हंगाम लांबणीवर जाणार आहे.
दौंड तालुक्यात गेली आठ दिवस ठिकठिकाणी पाऊस पडत आहे. यामुळे ऊस लागवड व खरीप हंगामातील पिकांची पेरणी रखडली आहे. अशातच शनिवारी व रविवारी जोरदार पाऊस झाला. रविवारी दुपारी सलग दोन पाऊस झाला. सलग झालेल्या पावसामुळे ओढे, नाले पाण्याने भरून वाहत आहेत. रस्त्यावर पाणी साचले होते. शेतामध्येही पाणी साचले आहे. भीमा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. ओढ्यांना पाणी आल्याने वाहतूक बंद पडली आहे. नागरीकांना जाण्यायेण्यासाठी पर्यायी मार्गाने जावे लागले.
सलग आठ दिवस झाले चांगला अवकाळी पाऊस पडत असल्याने खरीप हंगामातील कपाशी, उडीद, सोयाबीन, मका यांच्या पेरण्या व लागवडी किमान दोन ते तीन आठवडे लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. अनेक शेतकऱ्यांनी कपाशीचे बियाणे खरेदी केले आहे. परंतु पाऊस मात्र थांबलेला नाही. तुटणाऱ्या उसांना पाऊस उपयुक्त झाला आहे. तोडणीस आलेले कलिंगड व खरबूज पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच कलिंगडाची विक्री होत नसल्याने शेतकऱ्यांना ते फेकून देण्याची वेळ आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT