पुणे

दौंडमध्ये पिकांचे प्राथमिक पंचनामे सुरू

CD

देऊळगाव राजे, ता.२७ : दौंड तालुक्याच्या पूर्व भागात शेतातील भाजीपाल्यासह इतर पिके वाया गेली आहेत. यामुळे पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यामुळे दौंड महसूल विभागाच्या वतीने स्थळपाहणी केली व पिकांचे प्राथमिक पंचनामे सुरू केले आहेत.
पावसामुळे उसाच्या लागवडी रखल्या असून खरीप हंगाम लांबणीवर गेला आहे. यामुळे शेतकरी पाऊस उघडण्याची वाट पाहात आहे. त्यातच रविवारी दुपारी दोन तास पाऊस झाला. तसेच शेजारील काळेवाडी, बोरीबेल, राजेगाव, खानवटे, खोरवडी, आलेगाव, वाटलुज नायगाव, लोणारवाडी, शिरापूर, हिंगणीबेडी, पेडगाव, वडगाव दरेकर या गावांच्या परिसरातही जोरदार पाऊस झाला. पावसामुळे ओढे, नाले यांना पूर आला आहे. पुराचे पाणी शेतामध्ये शिरले आहे. सातत्याच्या पावसामुळे शेतांना तळ्याचे स्वरूप आले आहे.
शेतातील पिकात पाणी साचल्याने कलिंगड, खरबूज, उडीद, भाजीपाला, भुईमूग, कडवळ, मका ही पिके सडून गेली आहेत. पावसामुळे शेतात वळईला ठेवलेला कांदा खराब झाला आहे. अनेक शेतात ताली फुटल्या आहेत.
शेतकय्राची हातातोङांशी आलेली पिके वाया गेल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.दरम्यान महसुल विभागाच्या वतीने नुकसानीचे प्राथमिक पंचनामे सुरु झाले आहेत.


सातत्याने पाऊस झाल्याने तोडणीस आलेले एक एकर खरबूज काळे पडून सडू लागले आहे. यामुळे आपले एक लाख रुपयाचे आर्थिक नुकसान झाले आहे.
- नीलेश कदम, नुकसानग्रस्त शेतकरी आलेगाव, ता. दौंड
00547

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission : ‘’राजकीय पक्षांनी वेळीच आक्षेप नोंदवले नाहीत, जर असे घडले असते तर.. ‘' ; निवडणूक आयोगाने स्पष्टचं सांगितल!

Dahi Handi Festival : सरीवर सर! थरावर थर!! राज्यभरात दहीहंडीचा जल्लोष

INDIA Alliance News : 'मतचोरीच्या' विरोधात 'I.N.D.I.A' आघाडीचा 'मतदार हक्क यात्रा'द्वारे बिहारमध्ये एल्गार!

हसत खेळत असलेली बाई अशी... पुर्णा आजीच्या जाण्याचा प्रेक्षकांनाही बसला धक्का; म्हणाले- मन मानायलाच तयार नाही की...

WhatsApp: एक व्हिडिओ कॉल अन् बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या कसा होतोय लेटेस्ट फ्रॉड

SCROLL FOR NEXT