पुणे

राजेगाव रस्त्यावरील पुलाची दुरुस्ती करा

CD

देऊळगाव राजे, ता. १५ : राजेगाव व नायगाव (ता. दौंड) या रस्त्यावरील पुलांची कामे वर्षभरानंतरही पूर्ण झालेली नाहीत. पुलाच्या कामासाठी तयार करण्यात आलेल्या पर्यायी पुलांची पावसाने दुरवस्था झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना वाहतूक करताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे रस्त्याची व पुलाची कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी राजेगाव व नायगाव येथील ग्रामस्थांनी केली आहे.
साधारणतहा वर्षभरापूर्वी स्वामी चिंचोली ते राजेगाव नायगाव या रस्त्याचे मजबुतीकरण व त्यावरील पुलाची कामे सुरू करण्यात आली. परंतु रस्त्याची व पुलाची कामे संथ गतीने सुरू आहेत. राजेगाव- नायगाव रस्त्यावर तीन पुलाची कामे सुरू आहेत. यातील एका पुलाचे काम पूर्णत्वास आले असून, मेंगावडेवस्ती व ढमेस्ती येथील पुलाची कामे सुरू आहेत. तसेच आणखी एका पुलाचे काम सुरू होणार आहे. ढमेवस्ती जवळील पुलाचे काम दीड महिन्यापूर्वी सुरू केले आहे. ग्रामस्थांना ये- जा करण्यासाठी पर्यायी पूल तयार करण्यात आला आहे. परंतु पावसाने पुलाची दुरवस्था झाली आहे. शनिवारी (ता. १४) पुलावरून वाहतूक करताना ट्रक खचला होता. यामुळे तात्पुरती वाहतूक बंद पडली होती. नागरिकांना व विद्यार्थ्यांना यामुळे विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
वर्ष होऊनही रस्त्याचे काम समाधानकारक पूर्ण झालेले नाही. साधे रुंदीकरणाचे कामही अद्याप पूर्ण झाले नाही. रस्त्याच्या व पुलाच्या रखडत चाललेल्या कामामुळे ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत आहे. पुलाचे व रस्त्याचे मजबुतीकरणाचे काम पूर्ण होणार तरी कधी? असा संतापजनक प्रश्न शालेय विद्यार्थी उपस्थित करीत आहे. दरम्यान, या रस्त्याचे काम जाणीवपूर्वक रखडवण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

राजेगाव ते नायगाव या रस्त्याचे काम एक वर्षापासून संत गतीने चालू आहे. रस्त्यावरील मेंगावडेवस्ती व ढमेवस्ती येथील ओढ्यावरील पुलाचे काम पूर्ण झालेले नाही. यामुळे स्थानिक ग्रामस्थांना अडचणी येत आहेत.
- आदेश भोसले, राजेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: ''कटकारस्थान'', भाजप आमदाराने फडकावला उलटा तिरंगा; कोण आहेत संजय पाठक?

Neeraj Chopra Wife: 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राची पत्नी हिमानीने घेतला धाडसी निर्णय; दीड कोटींचं पॅकेज नाकारलं अन् टेनिसलाही अलविदा, कारण आता...

Latest Maharashtra News Updates : येरमाळा महसूल मंडळात गुरुवारी रात्री अतिवृष्टी

AUS vs SA 3rd T20I: ग्लेन मॅक्सवेलच्या 'विचित्र' शॉटने बदलले मॅचचे चित्र! ऑस्ट्रेलियाने थरारक विजयासह जिंकली मालिका Video Viral

Crime: धक्कादायक! २८ वर्षीय तरुणीचे अल्पवयीन मुलावर प्रेम जडले, घरातून पळवून नेलं अन्...; नंतर जे घडलं ते भयानक होतं

SCROLL FOR NEXT