पुणे

दौंडमध्ये कपाशीवर लालकुईचा प्रादुर्भाव

CD

देऊळगाव राजे, ता. १२ : सातत्याच्या पावसामुळे दौंड तालुक्यातील कपाशीवर लाल्या व लालकुई रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनात मोठा आर्थिक फटका बसणार आहे. पिके घ्यावीत तरी कोणती? असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे.
दौंड तालुक्यात मे व जून महिन्यात कपाशीची लागवड केली होती. तालुक्यात चालुवर्षी ७९० व्हेक्टरमध्ये कपाशीची लागवड झाली आहे. तालुक्यात गेली चार महिने झाले टप्याटप्याने पाऊस पडत आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वी तालुक्यात व देऊळगाव राजे परिसरात १३५ मिलिमीटरपर्यंत पाऊस पडला आहे. जमिनीत दलदल झाली आहे. कपाशीची बोंडे फुटण्याच्या अवस्थेत असतानाच पाऊस झाल्याने पाने गळती होऊन बोंडे सडू लागली आहेत.
गेल्या दहा दिवसांत कपाशीची झाडे झपाट्याने लालसर होऊन झाडांवर रोंगाचा प्रार्दुभाव झाला आहे. याचा उत्पादनात मोठा फटका बसणार आहे. सध्या कपाशीला शासणाचा ८१०० रुपये प्रतिक्विंटला हमीभाव मिळत आहे. त्यातच लाल्या व लालकुई रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशी उत्पादक शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरले आहे.
अतिपावसामुळे खरीप हंगामातील मका, उडीद, सोयाबीन, कांदा ही पिके वाया जाऊन ऊस लागवडीस फटका बसला आहे. अशातच कपाशीलाही फटका बसल्याने शेतकरी अधिकच खचला आहे.

हमीभाव वाढविण्याची मागणी
कपाशी पिकासाठी लागणारी खते, बियाणे, औषधे, मजुरीत वाढ झाली आहे. यामुळे शासनानेने कपाशीला किमान १२००० हजार रुपये प्रतिक्विंटलला हमीभाव देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

कपाशीची बोंडे फुटण्याच्या अवस्थेत असताना सलग झालेल्या पावसामुळे नुकसान झाले आहे. कपाशीची पाने पिवळी पडून झाडे लालसर झाली आहेत. यामुळे एकरी उत्पादनात शेतकऱ्यांना मोठी घट येणार आहे.
- वैभव सस्ते, कपाशी उत्पादक शेतकरी देऊळगाव राजे

00669

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Taxi: मुंबईतील वॉटर टॅक्सीचे काम कधी पूर्ण होणार? मोठी अपडेट आली समोर, वाचा सविस्तर...

INDW vs AUSW: एलिस पेरी आऊट न होताच गेली मैदानाबाहेर, पण भारताविरुद्ध कर्णधार एलिसा हेलीचं शतक

Kolhapur : आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रकरणात मोठी अपडेट, बहीण-भावानेच केलेलं कांड; मैत्री करत...

माेठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शनमोडवर; आमदार संग्राम जगताप यांना नोटीस देणार; नेमकं काय प्रकरण?

Barshi fraud:'रामगिरी शुगर्स कारखान्याची जमीन गहाण'; २ कोटी १० लाखाची फसवणूक, बार्शी पोलिसांत दोन महिलांसह सात जणांविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT