देऊळगाव राजे, ता. ३ : काळेवाडी (ता. दौंड) येथे शासनाच्या माध्यमातून जवळपास १२ हेक्टर जमिनीवर सौर प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. हा प्रकल्प जवळपास सहा मेगावॉट इतका क्षमतेचा असून, या प्रकल्पामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा आठ तास पूर्ण क्षमतेने वीज मिळण्यास मदत होणार आहे.
दौंड तालुक्यातील हा पहिलाच सौर कृषी वाहिनी प्रकल्प आहे. परिसरातील शेतकऱ्यांना आता पिकांना पाणी देण्यासाठी रात्री- अपरात्री जागण्याची गरज लागणार नाही. कडाक्याच्या थंडीमध्ये बिबट्याचा वावर असताना देखील रात्री थ्री फेज वीजपुरवठा असल्यामुळे रात्री शेताला पाणी द्यावे लागत आहे. परंतु, प्रकल्प पूर्णत्वास आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
शेतकऱ्यांना दिवसा आणि रात्री आवर्तन तत्त्वावर वीजपुरवठा केला जातो. रात्रीच्या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून, दिवसा शेतकऱ्यांना वीजपुरवठा करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. शासनाने शेतकरी वर्गाला दिवसा वीज मिळावी याकरिता ही योजना राबवली आहे. योजनेअंतर्गत गावात गायरान जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभे करण्यात येत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गाला दिवसा वीजपुरवठा होणार असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.
00788, 00789
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.