पुणे

चौधरवाडी वरुडेत धावले ३८० बैलगाडे

CD

दावडी, ता.२४: आदिशक्ती शेडुमाता देवीच्या उत्सवानिमित्त चौधरवाडी वरुडे (ता.खेड) येथे दोन दिवसाच्या पारंपरिक यात्रेला यंदा अभूतपूर्व उत्साह लाभला. सुमारे ३८० बैलगाडे धावल्यामुळे परिसर दुमदुमून गेला. विजेत्या बैलगाड्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्यात घाटाचा राजा दादाभाऊ तबाजी घाडगे (कनेरसर) व फायनल मध्ये एक नंबर सावंत कराळे जुगलबंदी (वाघोली) यांना मिळाला.

देवीचा अभिषेक, हारतुरे मांडवडहाळे करून यात्रेला सकाळी साडेसात वाजता सुरुवात झाली.
यात्रेचे मुख्य आकर्षण ठरलेल्या बैलगाडा शर्यतीत शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना यात्रेत आणून मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. या यात्रेसाठी एकूण पाच लाख इनाम ठेवण्यात आला होता. आयोजक समितीच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सुरक्षेची विशेष खबरदारी घेण्यात आली होती. शर्यत शिस्तबद्ध सुरळीत व शांततेत पार पडली.

यात्रा काळात खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह शिंदे, जिल्हा परिषद सदस्य दीप्ती भोगाडे, अक्षय रत्नपारखी,जयसिंग एरंडे,राजू नेवाळे हे मान्यवर उपस्थित होते.
यात्रेनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मंगला बनसोडे यांचा सोमवारी (ता.२३) रात्री दहानंतर लोकनाट्य तमाशा कार्यक्रम पार पडला. नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. तसेच स्थानिक व्यावसायिकांनी उभारलेल्या स्टॉल्समुळे यात्रेला बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले होते. खेळणी, मिठाई, पारंपरिक खाद्यपदार्थ यांची रेलचेल पाहायला मिळाली.
यात्रा यशस्वी होण्यासाठी बाळासाहेब चौधरी, अर्जुन चौधरी,दिलीप चौधरी, अशोक चौधरी, अविनाश चौधरी, विजय चौधरी, लक्ष्मण चौधरी, रामदास चौधरी, वसंत चौधरी, पोपट चौधरी, विशाल चौधरी, राहुल चौधरी, शहाजी जाधव यांनी प्रयत्न केले.


00141

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Char Dham Yatra 2026 : चारधाम यात्रेदरम्यान मोबाईवर बंदी, पूजा-अर्चा, विधीचे शुल्कही वाढले, जाणून घ्या नवे नियम

MI vs PBKS Live: रोहित शर्माची माघार! मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल, सलामीला कोणती जोडी?

Ganesh Naik : वाघ-बिबट्यांच्या शिकारीमागे आंतरराष्ट्रीय जाळे; वनमंत्री गणेश नाईक यांचा गौप्यस्फोट

RTE Admission Issue : वसईत आरटीई प्रवेशावरून गोंधळ; टोकन न मिळाल्याने पालकांमध्ये संताप, भर उन्हात पालकांच्या लांबचलांब रांगा

Latest Marathi News Live Update : टीसीएस प्रकरणात आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT