पुणे

खेड तालुक्यात रोहित्र चोऱ्यांमध्ये वाढ

CD

दावडी, ता. ५ : खेड तालुक्यात सध्या रोहित्र चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, विशेषतः खेड तालुक्याच्या पूर्व विभागातील दावडी, साबळेवाडी आणि मरकळ या गावांमध्ये रोहित्र चोरीचे प्रमाण वाढल्याने कारवाईसाठी खेड पोलिस ठाण्यामध्ये ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्य तथा खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे यांनी ग्रामस्थांंसह महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी वीज समस्यांवर सविस्तर चर्चा करत भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. रोहित्र चोरी रोखण्यासाठी तातडीने प्रभावी पावले उचलावीत, अशी आग्रही भूमिका यावेळी मांडण्यात आली. यानंतर खेड पोलिस ठाण्याला भेट देऊन पोलिस अधिकारी चव्हाण यांच्याशी चर्चा करून रोहित्र चोरांचा तत्काळ छडा लावून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली. यावर पोलिस अधिकाऱ्यांनीही त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी संभाजी घारे, अनिल नेटके, किरण लोखंडे, विजयानंद आवटे, सुनील वर्पे, अक्षय चव्हाण, संदीप साबळे, पंकज गायकवाड, कैलास घेनंद, सागर चव्हाण, योगेश कुटे, नितीन आवटे, रूपेश घारे, दत्तात्रेय वर्पे, दत्तू अण्णा वर्पे, संदीप वर्पे, अनिकेत लोखंडे, सोन्या लोखंडे, बबलू लोखंडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs ENG SF: संजू सॅमसनचे शतक थोडक्यात हुकले, पण पठ्ठ्याने वानखेडे स्टेडियम दणाणून सोडले; अनेक विक्रम मोडले

Transporters Strike: वाहतूकदारांचा मोठा निर्णय! सरकारशी चर्चेनंतर ट्रान्सपोर्ट संप पुढे ढकलला; राज्याला दिलासा, पण कधीपर्यंत?

T20 WC, IND vs ENG SF: संजू सॅमसनची वादळी अर्धशतक! गौतम, रोहित, विराटच्या विक्रमाशी बरोबरी; इशानसह ९७ धावा जोडल्या

बीएमसी जिंकताच भाजपची मोठी चाल! मुंबईत ८१ सदस्यीय नवी फौज तयार; टीममध्ये उत्तर भारतीयांचा बोलबाला, कुणाकडे कोणती जबाबदारी?

आपला स्वतःचा चित्रपट आहे असं समजून... आगामी 'राजा शिवाजी' चित्रपटाबद्दल काय म्हणाला रितेश देशमुख

SCROLL FOR NEXT