दावडी, ता. १२ : इराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य तुटवड्याच्या भीतीने नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगसाठी धाव घेतली. त्यामुळे खेड तालुक्यातील गॅस एजन्सींवर मोठी गर्दी होत आहे.
खेड तालुक्यातील पूर्व भागातील खरपूडी, निमगाव, दावडी, कनेरसर, रेटवडी आणि वाफगाव या गावांमधील गॅस एजन्सींमध्ये सिलेंडरचा साठा संपल्याने नागरिकांना तालुक्याच्या मुख्य गॅस एजन्सीकडे धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे एजन्सीसमोर नागरिकांच्या रांगा लागल्या असून मोठी गर्दी उसळली आहे.
दरम्यान, एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर नागरिक गॅस बुकिंग करत असल्याने बुकिंग प्रणालीच्या सर्व्हरवर ताण आला आणि सर्व्हर बंद पडल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे गॅस बुकिंगची प्रक्रिया ठप्प झाली.
गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्यामुळे तसेच बुकिंगही होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी नागरिकांची धांदल उडाली असून प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन गॅस पुरवठा सुरळीत करून बुकिंग प्रणाली सुरळीत करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.