पुणे

खेड सिटी परिसराला कचऱ्याचा विळखा

CD

दावडी, ता. २७ : खेड तालुक्यातील पूर्व भागातील सेझ व एमआयडीसी परिसरात कचऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. राजगुरुनगर- पाबळ मार्गांवरील सेझ परिसरात निमगाव गोसासी, रेटवडी, दावडी शिवेवर रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
या ठिकाणी रस्त्याने ये-जा करणारे काही नागरिकही बिनधास्तपणे कचरा टाकत असल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.
प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा संतप्त आरोप जिल्हा परिषद गटनेते ॲड. विजयसिंह शिंदे आणि जिल्हा परिषद सदस्य दिप्ती भोगाडे यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे, याच मार्गावरून श्री क्षेत्र निमगाव खंडोबा व कनेरसर यमाई देवस्थानाकडे भाविकांची मोठी वर्दळ असते. मात्र, या अस्वच्छतेमुळे भाविकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. धार्मिक स्थळांकडे जाणाऱ्या मार्गावर अशी परिस्थिती असणे ही लाजिरवाणी बाब असल्याचे स्थानिकांचे मत आहे.
काही गावांमध्ये कचरा संकलनासाठी घंटागाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या असल्या तरी गोळा केलेल्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी जागेचा अभाव असल्याने समस्या अधिकच गंभीर बनली आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
या सर्व प्रकाराला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित करत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही स्थानिक नागरिकांनी आहे.

DWD26A00218, DWD26A00219

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ट्रॅफिकला ब्रेक लागणार! १ तासाचा प्रवास आता फक्त १० मिनिटांत होणार; पूर्व-पश्चिम मुंबई जोडणारा गेमचेंजर प्रकल्प आहे तरी काय?

IPL 2026 Second Phase Schedule: इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील ५० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, १३ एप्रिल ते २४ मे रोजी रंगणार सामने

युद्धामुळे संकट! केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार? PM मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, बोलावली बैठक

Mumbai News: मिठी नदीची साफसफाई केली जाणार, नऊ लाख टन गाळ उपशाचे उद्दिष्ट; कधीपासून काम सुरू होणार?

तुम्हाला माहिती आहे का? ‘धुरंधर’चं शूटिंग संजय दत्तच्या शाळेतच झालंय! 'हे' कलाकारही आहेत माजी विद्यार्थी

SCROLL FOR NEXT