दावडी, ता. २५ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत (एनएमएमएस) दावडी (ता. खेड) येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमंत महाराजा फत्तेसिंगराव गायकवाड माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. विद्यालयातील इयत्ता आठवीचे एकूण ४५ विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते. त्यांपैकी ३० विद्यार्थी पात्र ठरले असून, ऋतुजा कदम (१३८ गुण), स्वरा लोणकर (१३१ गुण) आणि ध्रुव गावडे (९३ गुण) या तीन विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. शिष्यवृत्ती विभाग प्रमुख अनिता गोरे यांसह शिक्षक संदीप तांदळे, तृप्ती शेंडे, आशा लांडे, सरस्वती बनसोडे यांनी विद्यार्थ्यांस मार्गदर्शन केले. या यशाबद्दल विद्यालयाच्या प्राचार्य रत्नप्रभा शितोळे, तुकाराम गायकवाड, सरपंच राहुल कदम, सुरेश डुंबरे, वैशाली गव्हाणे आदींसह ग्रामस्थ व पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.