दावडी, ता. २ : विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या दर्जाबाबत आणि तो तयार करण्याच्या पद्धतीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. खेड तालुक्याच्या पूर्व भागातील शाळांची पाहणी केली असता, काही शाळांमध्ये आहार पुरवठा संस्थेमार्फत पोषण आहार दिला जात असल्याचे, तर काही शाळांमध्ये गेल्या महिनाभरापासून आहाराचा पुरवठाच झालेला नसल्याचे समोर आले. अशा परिस्थितीत काही मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समित्यांनी लोकसहभागातून विद्यार्थ्यांसाठी आहाराची व्यवस्था करून योजना सुरू ठेवली आहे.
तालुक्यातील काही शाळांमध्ये पोषण आहारासाठी वापरण्यात येणाऱ्या धान्याच्या दर्जाबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. आहार तयार करण्याची पद्धत, स्वच्छता तसेच धान्याची गुणवत्ता याकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्यास त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीवर प्रभावी देखरेख ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.
गुणवत्तेबाबत दक्षता घेण्याच्या सूचना
पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत प्रशासनाने शाळांना दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. एफडीएच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी कार्यवाही सुरू केली आहे. १२ ऑगस्टपासून पोषण आहाराचा पुरवठा सुरू झाल्याचे गटशिक्षण अधिकारी अमोल जंगले यांनी सांगितले. पोषण आहार शाळेत उतरवून घेताना त्याचे नमुने तपासण्याचे आदेश मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समित्यांना देण्यात आले आहेत. याबाबत केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकाऱ्यांनाही सूचना देण्यात आल्या आहेत.
‘‘गेल्या एक महिन्यापासून शाळेला पोषण आहार येत नाही. त्यामुळे आम्ही व शाळा व्यवस्थापन समितीने लोकसहभागातून पोषण आहाराची व्यवस्था करून योजना सुरळीत ठेवली आहे.’’
-सचिन वाघोले, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा, देऊळवाडा, निमगाव
एफडीएच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी कार्यवाही सुरू केली आहे. १२ ऑगस्टपासून पोषण आहाराचा पुरवठा सुरू झाला आहे. संबंधित आहार पुरवठा संस्थेला त्याबाबत सूचना दिल्या आहेत. पश्चिम भागात पुरवठा सुरू झाला असून, दोन ते तीन दिवसांत पूर्व भागातील सर्व शाळांमध्ये पुरवठा होईल.
-अमोल जंगले, गटशिक्षण अधिकारी, खेड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.