पुणे

घोडेगावात शौर्य प्रशिक्षण वर्गाचा समारोप उत्साहात

CD

घोडेगाव ता. २९ : घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील जनता विद्या मंदिराच्या प्रांगणात २१ ते २८ मे दरम्यान विश्व हिंदू परिषद-बजरंग दल पश्चिम महाराष्ट्र प्रांत यांच्या वतीने आयोजित शौर्य प्रशिक्षण वर्गाचा समारोप
समारंभ उत्साहात पार पडला. यानिमित्त शहरात पथसंचलन करण्यात आले. या प्रशिक्षणात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सुमारे २००हून अधिक जणांनी सहभाग घेत स्वसंरक्षण, बौद्धिक, योग तसेच युद्ध कलेचे प्रशिक्षण घेतले.
कार्यक्रमात हिंदुराव गोळे यांनी प्रस्तावना दिली. त्यानंतर प्रतिमा पूजन होऊन जनता विद्या मंदिरच्या क्रीडांगणावर कराटे, अर्धदंड/यष्टी, दंड युद्ध, अग्नी, बाधा आदी प्रात्यक्षिके सादर केले.
याप्रसंगी माजी खासदार शिवाजी आढळराव, माजी आमदार शरद सोनवणे, भाजपचे आंबेगाव तालुकाध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे आदी उपस्थित होते.
आढळराव म्हणाले, ‘‘अशा प्रकारच्या शौर्य प्रशिक्षण वर्गामधून तरुणांची बौद्धिक व शारीरिक क्षमता जोपासण्यास मदत होते. त्यासाठी तरुणांनी अशा प्रशिक्षण वर्गांचा नक्की लाभ घ्यावा.’’ प्रशांत काळे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदी सोलापुरात दाखल; थोड्याच वेळात होणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT