पुणे

आंबेगाव तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर

CD

घोडेगाव, ता. १६ : आंबेगाव तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. प्रभागनिहाय आरक्षण सोडती काढण्याबाबतचे निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत. या सर्व ग्रामपंचायतींच्या विशेष ग्रामसभांचे आयोजन करून आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार संजय नागटिळक यांनी दिली.
आंबेगाव तालुक्यातील लोणी, फलोदे, कुशिरे बुद्रुक, कोलतावडे, कानसे, गोहे बुद्रुक, तळेकरवाडी, चांडोली खुर्द, अवसरी बुद्रुक, निरगुडसर, पहाडदरा, पारगांव तर्फे अवसरी बुद्रुक, जारकरवाडी, चास, ठाकरवाडी, वाळुंजनगर, पाटण, टाव्हेरवाडी, चपटेवाडी, सुपेधर, फुलवडे, डिंभे बुद्रुक, टाकेवाडी, तांबडेमळा, पिंपरगणे, म्हाळुंगे तर्फे घोडा, मांदळेवाडी, नांदुर, बोरघर, जाधववाडी या ३० ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय सोडती काढण्यासाठी विशेष ग्रामसभा घेतल्या जाणार आहेत अशी माहिती निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार डॉ. सचिन वाघ यांनी दिली.

असा आहे निवडणूक कार्यक्रम
१) २१ जूनला प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढणे
२) २३ जूनला आरक्षण प्रारूप अधिसूचनेला जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता
३) २६ जून रोजी प्रभागनिहाय आरक्षण प्रसिद्ध करणे
४) हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत २७ जून ते ३ जुलैपर्यंत
५) प्रांताधिकारी यांचा अभिप्राय ७ जुलैअखेर
६) १४ जुलैला जिल्हाधिकारी अंतिम प्रभागनिहाय आरक्षण प्रसिद्ध करणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISrael-Iran War : इराणचा तेल जहाजावर हल्ला, मुंबईच्या इंजिनिअरचा मृत्यू; समुद्रात उड्या मारल्याने २७ जण बचावले

Teacher Cyber Fraud Case : तुमच्या मोबाईलवरही असा व्हिडिओ कॉल येतोय? CBI अन् पोलिसांच्या नावाने निवृत्त शिक्षकाला घातला 59 लाखांचा गंडा, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : सिंहगड रोड पानमळा परिसरात गॅससाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा

इलॉन मस्कने लॉन्च केले 'Macrohard'! आता एकटा AI करणार संपूर्ण ऑफिसच काम; किती किंमतीत करता येणार खरेदी? पाहा सर्व माहिती

Summer Hydration Tips: उन्हाळ्यात ‘ही’ 3 पेये ठरतात शरीरासाठी रामबाण; डिहायड्रेशन टाळण्यासाठी तर आहेत बेस्ट

SCROLL FOR NEXT