Panchayat samiti scheme to beneficiary avinash rahane tehsildar pramila walunj Sakal
पुणे

Pune News : लाभार्थ्यांची अडवणूक करणाऱ्यांवर कारवाई करावी,अविनाश रहाणेंची तहसीलदारांकडे मागणी

आंबेगाव तहसीलदार कार्यालयात अनेक महिने प्रलंबित असणारी लोकांची कामे वेळेत करावी.

सकाळ वृत्तसेवा

घोडेगाव : पंचायत समितीमध्ये अनेक वर्षांपासून लाखो रुपये खर्च बंद असलेला सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करावा, सरपंच-उपसरपंच यांची मनमानी रोखावी, त्यांना प्रशिक्षण द्यावे. तसेच आपल्या विभागामार्फत लाभार्थ्यांसाठी अनेक योजना राबविल्या जात आहे.

परंतु संबंधित लाभार्थ्याचे काम झाल्यानंतर त्याला पैसे देण्यासाठी त्याची अडवणूक केली जाते, याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख ॲड. अविनाश रहाणे यांनी गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज व तहसीलदार यांच्याकडे केली.

घोडेगाव येथील (ता. आंबेगाव) पंचायत समिती कार्यालय व तहसील कार्यालय येथील गटविकास अधिकारी वाळुंज व तहसीलदार संजय नागटिळक यांची भेट घेतली व विविध समस्या मांडल्या.
आंबेगाव तहसीलदार कार्यालयात अनेक महिने प्रलंबित असणारी लोकांची कामे वेळेत करावी.

ई रेशन कार्ड योजना तालुक्यात त्वरित सुरू करावी. सुविधा केंद्र चालक वारेमाप पैसे घेतात. त्यांच्या वर अंकुश ठेवावा. अनेक दाखले प्रलंबित आहेत ते तातडीने देण्यात यावेत, तहसीलदार कार्यालयात सी.सी.टिव्ही कॅमेरे सुरू करावेत, अशा विविध मागणी तहसीलदार नागटिळक यांच्याकडे राहणे यांनी केली.

यावेळी त्यांचे समवेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तालुका प्रमुख सुरेखा निघोट, रंगनाथ थोरात, विजय जाधव, सुवर्णा डोंगरे, नंदकुमार बोऱ्हाडे, चंद्रकला पिंगळे, ललिता बांबळे, उमेश लोखंडे, सचिन घोलप, संभाजी काळे, गुलाब गावडे, विजया चव्हाण आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Well Water Waves विहिरीत समुद्रासारख्या लाटा, पाण्याची गूढ हालचाल; VIRAL VIDEOने खळबळ, गावकऱ्यांनी काय सांगितलं?

Marathi News Live Updates : कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी सरकारचा कट; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप

Kitchen Vastu Tips: तुमचे स्वयंपाकघर योग्य दिशेला आहे का? जाणून घ्या गॅस शेगडी आणि सिंक कुठे असावे!

Monsoon Skincare Mistakes: पावसाळ्यात स्किनकेअर करताना अनेकजण करतात 'ही' चूक; तुमच्याकडूनही होत नाही ना?

FDA Action: हॉटेल, रेस्टारंटवर करडी नजर, अ‍ॅनालॉग पनीरवरील बंदीनंतर एफडीएची राज्यभरात विशेष तपासणी

SCROLL FOR NEXT