फुलवडे / घोडेगाव, ता. २७ : बोरघर (ता. आंबेगाव) येथील कोकणेवाडी येथे रस्त्याच्या बाजूला झाडाखाली सावलीत बसलेल्या दोघांना दुचाकीची जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला.
याबाबत घोडेगाव पोलिसांनी माहिती दिली की, कोकणेवाडी येथे डिंभे- बोरघर रस्त्याच्या बाजूला झाडाखाली सावलीत बसलेल्या दोघांना दुचाकीस्वाराची जोरदार धडक बसली. या अपघातात बाळू तुकाराम बांबळे (वय ४५ रा. बोरघर) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्याबरोबर असलेला सुनील भीमसेन बांबळे (वय ३६) हे जखमी झाले. अपघातानंतर दुचाकी चालक अपघाताची कोणतीही माहिती न देता पळून गेला. याबाबतची फिर्याद तुकाराम बांबळे यांनी दिली. त्यानुसार याप्रकरणी दुचाकी चालक ओमकार नवनाथ भारमळ (वय २१, रा. फुलवडे, ता. आंबेगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला.
: PHE24A02915
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.