पुणे

आत्महत्या प्रकरणी दोषींवर कारवाई व्हावी; माकपची मागणी

CD

घोडेगाव, ता. १० ः नागापूर (ता. आंबेगाव) येथे शेतमजुरी करणाऱ्या आदिवासी कुटुंबातील एकनाथ बर्डे या व्यक्तीस शेतमालकाने अपमानास्पद वागणूक देऊन व मारहाण केल्यामुळे एकनाथ बर्डे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. दोषी व्यक्तींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी माकपच्या वतीने आंबेगाव तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली. या घटनेचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आंबेगाव तालुका समितीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
आरोपी घनश्याम निकम याला पोलिसांनी अटक करून त्याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त करणे, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणे व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत हे प्रकरण पोलिसांनी धसास लावावे व गुन्हेगारास कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी माकप आंबेगाव तालुका समितीने निवेदनाद्वारे केली. शासनाने पुढील काळात पीडित कुटुंबाला आवश्यक ते सहकार्य करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळी माकप तालुका समितीचे बाळू वायाळ, डॉ. अमोल वाघमारे, अशोक पेकारी, राजू घोडे, अविनाश गवारी, देविका भोकटे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT