पुणे

भीमाशंकर यात्रेसाठी पोलिस प्रशानस सज्ज रहावे

CD

घोडेगाव, ता. २ : श्री क्षेत्र भीमाशंकर श्रावण यात्रेच्या काळात पार्किंग व देवदर्शनाला जाणाऱ्या लोकांची लूट थांबविण्यासाठी प्रशासन व पोलिसांनी प्रयत्न करावे. एसटी महामंडळाने मिनी बसची संख्या वाढवून चांगली सेवा द्यावी. असे आवाहन प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी केले.

घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील तहसील कार्यालयात श्रावण महिन्यातील भीमाशंकर यात्रा आढावा बैठकीत ते बोलत होते.
याबैठकीस तहसिलदार संजय नागटिळक, प्रशांत बेडसे, सहायक गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे, सहायक पोलीस निरीक्षक किरण भालेकर, देवस्थान विश्वस्त मधुकर गवांदे, रत्नाकर कोडिलकर, दत्तात्रेय कौदरे, चंद्रकांत कौदरे, सरपंच दत्तात्रेय हिले, नायब तहसिलदार अनंता गवारी, दामुराजे असवले, बांधकाम विभागाचे सुरेश पठाडे, विद्युत मंडळाचे स्वप्निल काटकर उपस्थित होते.

मिनीबस देण्याच्या सूचना
वाहनतळ ते बसस्थानक या वाहतुकीसाठी मिनीबसचे नियोजन व वाहनतळ बनविणे हे महत्वाचे काम असते. एसटी महामंडळाने मिनीबस मुबलक प्रमाणात दयाव्यात. अशी सुचना प्रांताधिकारी गोंविद शिंदे यांनी केली.

श्रावण महिन्याचे नियोजन
आपत्कालीन कक्ष, सर्व विभाग प्रमुखांनी दक्ष रहावे, वाहतळामध्ये पाणी, स्वच्छतागृह, लाईट, रूग्णवाहिका, आरोग्य सुविधा, क्रेन यांची व्यवस्था करावी. अन्न व औषध प्रशासनामार्फत भीमाशंकरमधील पेढे दुकानदार व हॉटेलमधील अन्न पदार्थांची तपासणी करावी.

वाहनतळांची दुरूस्ती
वाहनतळांवर आवश्यक त्याठिकाणी मुबलक प्रमाणात मुरूम टाकावा तसेच भीमाशंकर मंदिराकडे जाणाऱ्या पायरी मार्गाचे काम सुरू असल्याने सध्या छोट्या रस्त्याने भाविकांना मंदिराकडे जावे लागत आहे. हा पायरी मार्ग लवकर सुरू करावा, अशी मागणी देवस्थानच्या पदाधिका-यांनी केली.

व्हीआयपी दर्शनासाठी निर्बंध
भीमाशंकरमध्ये व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली एका व्हिआयपीच्या दररोज ३ ते ४ गाडया येतात. त्या गाडया वाहनतळांपासून मंदिराकडे सोडल्यानंतर वाहनतळांवर उपस्थित असलेले भाविक पोलीस प्रशासनाबरोबर वाद घालत आहे. त्यामुळे व्हीआयपी दर्शनासाठी येणाऱ्यांवर निर्बंध आणावेत किंवा त्यांनाही वाहनतळांवर त्यांच्या गाडया लावून इतर वाहनाने मंदिराकडे न्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

श्रावण महिन्याच्या तारखा
एकूण - पाच सोमवार
५, १२, १९, २६ ऑगस्ट.
२ सप्टेंबर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT