पुणे

अळ्या असलेले जेवण खाऊ घालणाऱ्यांवर कारवाई करा

CD

घोडेगाव, ता. ९ : गोहे बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील आश्रमशाळेतील मुलांना आळ्या असणारे जेवण खाऊ घालणाऱ्यांवर तीन दिवसांत दोषारोप ठेवून कडक कारवाई करावी, स्त्री शक्ती संस्थेकडून काम काढून घ्यावे, आदी मागण्या करण्यासाठी विविध आदिवासी संघटना तसेच लोकप्रतिनिधींनी एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी संदीप पाटील यांच्याबरोबर यांची बैठक पार पडली.

घोडेगाव येथील सेंट्रल किचनमधून आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ तालुक्यातील १६ शाळांमधील चार ते पाच हजार विद्यार्थ्यांना स्त्री शक्ती या संस्थेमार्फत अन्न पुरवठा केला जातो. मात्र, रविवारची घटना सेंट्रल किचनची जबाबदारी असणाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच झाली. त्यामुळे स्त्री शक्ती या संस्थेवर कारवाई व्हावी, त्यांचे टेंडर रद्द करावे, व्यवस्थापकावर कारवाई करावी अशी मागणी बैठकीत बिरसा ब्रिगेड संघटनेचे प्रवीण पारधी यांनी केली.

यावेळी बिरसा ब्रिगेडचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रवीण पारधी म्हणाले की, शाळेत आलेले अन्न तपासून घेण्याची जबाबदारी मुख्याध्यापक, अधीक्षक व मदतनीस यांची आहे. त्यांनीही आपल्या कामात हलगर्जीपणा केला. सेंट्रल किचनमधील प्रयोगशाळेत अन्न तपासले गेले नाही. दोन अधीक्षकांनीही कामात कसूर केल्याचे समोर येत असल्याने त्यांचे निलंबन केले जावे. पुढील पंधरा दिवसांत सर्व शाळांवर पालक मेळावे लावले जावेत.

दरम्यान, सेंट्रल किचनच्या नेहमीच तक्रारी असतात. त्यामुळे हे कायमस्वरूपी बंद कराचे, जुन्या पद्धतीने शाळेतच जेवण बनवून विद्यार्थ्यांना दिले जावे, तसेच याप्रकरणातील दोषींवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी एसएफआय संघटनेचे समीर गारे यांनी केली आहे.

मुलांच्या जेवणात आळ्या निधाव्यात हा प्रकार अतिशय निंदनीय आहे. याची चौकसी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल तसेच विविध संघटनांकडून आलेल्या मागण्या वरिष्ठ कार्यालयास कळविल्या जातील, सेंट्रल किचनमधून मुलांना चांगले व दर्जेदार जेवण जाईल याची काळजी प्रकल्प कार्यालय घेईल.
- संदीप पाटील, प्रकल्प अधिकारी

03167

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Maratha Reservation: मनाेज जरांगे यांच्या उपोषणाचा १४वा दिवस; अभिजित दिपकेंचा सरकारवर निशाणा, ‘चर्चेसाठी पुढे या’

Numerology: 'या' जन्मतारखांच्या लोकांवर असते बुध-शुक्राची कृपा; कमी मेहनतीत मिळवतात मोठे यश!

Latest Marathi News Live Update : MPSC पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्र्यांना दोष देणे चुकीचे; राजीनामा नव्हे, सिस्टीम बदलण्याची गरज : योगेश कदम

Rabid Dog Attack: पिसाळलेल्या कुत्र्याने आळे गावात उडवली खळबळ; नऊ जणांना चावा, अनेकांना रुग्णालयात हलविले

SCROLL FOR NEXT