पुणे

अळ्यायुक्त जेवणप्रकरणी दोन अधीक्षक निलंबित

CD

घोडेगाव, ता. ११ : आदिवासी विद्यार्थ्यांना अन्नातून अळ्यायुक्त जेवण पुरविल्याप्रकरणी मध्यवर्ती स्वयंपाक गृहावर नेमणूक असलेले प्रवीण नारायण शिंदे व दिनेश अरविंद पाटील या दोन शासकीय अधीक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे चौकशी समितीचे प्रमुख अभय गोवेकर व प्रकल्प अधिकारी संदीप पाटील यांनी सांगितले.
कोटमदरा (ता. आंबेगाव) येथून आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यातील सोळा आश्रमशाळांमध्ये चार हजारांपेक्षा अधिक आदिवासी विद्यार्थ्यांना स्त्री शक्ती या संस्थेकडून अन्नपुरवठा केला जातो. गोहे येथील आश्रम शाळेत सात जुलै रोजी दिलेल्या जेवणातील सोयाबीनच्या भाजीत अळ्या सापपडल्याने बिरसा ब्रिगेड, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया, आम आदमी पार्टी, शाश्वत संस्था, कृषी उत्पन्न बाजार समिती खेड आदी संघटनांसह जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती स्वयंपाकगृहावर देखरेखीसाठी नेमण्यात आलेल्या दोन अधीक्षकांवर निलंबनाची कारवाई करावी व संबंधित संस्थेचा अन्नपुरवठा ठेका रद्द करावा. या मागणीसाठी मागील तीन दिवसांपासून घोडेगाव येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयावर आंदोलन सुरू केले होते. अखेर संघटनांच्या आंदोलनासमोर प्रशासनाला नमते घेत मध्यवर्ती स्वयंपाक गृहावर नेमणुकीस असणाऱ्या दोन शासकीय अधीक्षकांवर निलंबनाची कारवाई करावी लागली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवदत्त निकम यांनी आंदोलन स्थळी तीन दिवस उपस्थित राहून आंदोलनास पाठिंबा दिला.
दरम्यान, आंदोलन केल्याने लढ्याला यश आले असल्याचे बिरसा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रवीण पारधी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

Dr. Ratnakar Mahajan Pass Away: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन; महाराष्ट्रातील पुरोगामी, वैचारिक चळवळीतील अभ्यासू आवाज हरपला

Marathi News Live Updates: स्वच्छता साहित्यासाठी डीबीटी अशक्य, स्थायी समितीसमोर फेरप्रस्ताव

Karad Chain Snatching: रेकॉर्डवरील गुन्हेगारावर ‘जॅक’ पडला भारी; कऱ्हाडमध्ये उसातून शोधला सोनसाखळी चोर, श्वानाने काढला माग

SCROLL FOR NEXT