पुणे

डिंभे धरणाच्या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना इशारा

CD

घोडेगाव, ता. ४ ः आंबेगाव तालुक्यात पश्चिम आदिवासी भागात दोन दिवस मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. अहुपे, भीमाशंकर व पाटण खोऱ्यात मुसळधार पावसामुळे ओढे, नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले. तर बुब्रा नदी व घोड नदी दुथडी भरून वाहत आहे. डिंभे धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत असून सध्या धरणातून १८,००० क्युसेसने पाणी सोडले जात आहे. कालच प्रशासनाने नदीकाठच्या गावांना पाणी सोडा असल्याचा इशारा दिला असल्यामुळे कोणतीही जीवित अगर इतर हानी झालेली नाही.

गेली दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे डिंभे धरण दुपारी तीन वाजेपर्यंत ९३.४५ टक्के भरले होते. धरणातील एकूण साठा १०.९२ टीएमसी झाला आहे. धरणात २८ हजार क्युसेसने पाणी येत असून धरणातून १८ हजार क्युसेसने पाणी सोडले जात आहे. पूर नियंत्रण करण्यासाठी अजूनही घोड नदीत पाणी सोडले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. धरणातून सकाळी सात वाजता २५०० क्युससने, साडेचार वाजता सात हजार पाचशे क्युसेसने, सकाळी नऊ वाजता नऊ हजार क्युसेसने तर दुपारी बारा वाजल्यापासून १८ हजार क्युसेसने पाणी सोडले जात आहे.

धरण परिसरात आज २१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे तर, आजअखेर एकूण पाऊस ६४४ मिलिमीटर पडला आहे. आवटे भीमाशंकर पाटण खोऱ्यात मुसळधार पावसाने आदिवासी जनतेचे जनजीवन विस्कळीत झाले आहे, पुढे नाल्यांना पूर आल्यामुळे नागरिक घराबाहेर न पडता आपल्या घरातच सुरक्षित राहिले आहेत. येथील मुख्य पीक असणारे भात याची पाच हजार १०० हेक्टर क्षेत्रात आजपर्यंत लागवड झाली आहे.

आंबेगाव तालुक्यातील मंडलनिहाय्य ‘क’ आज पडलेला पावसाची नोंद पुढीलप्रमाणे
घोडेगाव ३८.३ मिलिमीटर, आंबेगाव २२६.३ मिलिमीटर, कळंब वीस मिलिमीटर, पारगाव ७.३ मिलिमीटर, मंचर दहा मिलिमीटर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: ट्रम्प यांचे एक वक्तव्य आणि शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1400 अंकांनी खाली; Indigo चे शेअर्स चर्चेत

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

SCROLL FOR NEXT