घोडेगाव, ता. १७ : राज्यात व देशभरात शालेय विद्यार्थी यांच्यावर होत असलेल्या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील पोलिसांकडून सतत जनजागृती मोहीम राबवली जात आहे. तालुक्यातील सर्व शाळा, कॉलेजमधील मुख्याध्यापक, प्राचार्य, मॅनेजमेंट, महिला शिक्षिका, विद्यार्थिनी व त्यांचे पालक यांची संयुक्त बैठक घेऊन विद्यार्थी- विद्यार्थीनी यांच्या सुरक्षेबाबत सहायक पोलिस निरीक्षक किरण भालेकर महत्त्वाच्या सूचना देत आहेत.
घोडेगाव पोलिस ठाणे कार्यक्षेत्रात असलेल्या शाळा, महाविद्यालयातील परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, त्यांचे मॉनिटरिंग करणे, तक्रार पेटी सुरक्षित ठिकाणी बसवून ती नियमित उघडून त्यातील तक्रारींचे निवारण करणे, ग्रे एरियामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, पीए सिस्टीम बसवून त्याद्वारे सूचना देणे, महिला दक्षता समिती स्थापन करून त्यांच्यामार्फत विद्यार्थिनींच्या समस्या जाणून घेऊन कार्यवाही करणे, नियंत्रण कक्षाची स्थापना करून सीसीटीव्हीद्वारे संपूर्ण परिसरावर नियंत्रण ठेवणे, शाळा, महाविद्यालय परिसरात वाढत चाललेले अंमली पदार्थांचे सेवनाबाबत संकल्प नशामुक्ती अभियानाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये जागृती करून त्यांचे समुपदेशन करणे. तसेच मोबाईल वापराचे फायदे व वाईट परिणाम, सायबर सेल बाबत माहिती, मोटार वाहन कायदा आदींबाबत सहायक पोलिस निरीक्षक भालेकर प्रत्येक शाळा, महाविद्यालयात जाऊन मार्गदर्शन करत आहे.
माहिती देण्याचे आवाहन
विद्यार्थिनी शाळेत ये-जा करताना काही जणांकडून अश्लील किंवा अनावश्यक कमेंट केल्या जातात. अशा कमेंट होत असल्यास विद्यार्थिनींनी आई- वडील, शिक्षिका किंवा निर्भया पथकाला माहिती द्यावी. पोलिसांच्या ११२ या हेल्पलाइन क्रमांकावर माहिती द्यावी, तसेच घोडेगाव पोलिस ठाण्यात येऊन माहिती द्यावी, असे आवाहन घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक किरण भालेकर यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.