पुणे

घोडेगाव बाजारपेठेत घुबडाला जीवदान

CD

घोडेगाव, ता. : घोडेगाव (ता. आंबेगाव) बाजारपेठेत गव्हाणी जातीचे घुबड चक्कर येऊन पडले होते. पक्षी निरीक्षक नीलेश चिलेकर व सागर कर्पे यांनी त्याला जीवदान दिले. त्याला वनविभाग कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिले.
घोडेगाव येथील पक्षी निरीक्षक चिलेकर व कर्पे म्हणाले की, गव्हाणी घुबड पक्षी साधारणपणे ३६ सेंटीमीटर आकाराचा आहे. पाठीकडून सोनरी बदामी आणि राखाडी रंगाचा असतो. त्यावर काळ्या-पांढऱ्या रंगाचे पट्टे असलेला व पोटाकडे मुख्यत्वे रेशमी पांढरा रंग त्यावर बदामी रंगाची झाक आणि गडद तपकिरी रंगाचे ठिपके असतात. नर-मादी दिसायला सारखेच असतात.
रात्रीचा संचार असणाऱ्या घुबड पक्षाने घोडेगाव बाजारपेठेतील एखाद्या इमारतीच्या कोनाड्यात रात्रीच्या वेळी येऊन बसले. तेथून ते खाली पडले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे, असे दक्ष नागरिक संदेश चिलेकर यांनी वनविभाग कर्मचारी व पक्षी निरीक्षक यांना दिली. घुबड त्याच्या अधिवासात सोडणार असल्याचे वनरक्षक संजय गायकवाड यांनी सांगितले.

03632

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

Dubai Call Center Scam: वाघोलीतील उद्योजकाची ७० लाख ८५ हजारांची फसवणूक; दुबई कॉल सेंटर रॅकेट उघड, गुजरातच्या टोळीवर गुन्हा

BJP Ideology Camp: भाजप-आरएसएस प्रशिक्षण शिबिरात नगरसेवकांना वैचारिक धडा; ध्येयधोरणांपासून भटकू नका, कान टोचले

Crude Oil Crisis: इंधन दरवाढीविरोधात उद्या राज्यभर आंदोलन! तुमच्या शहरात पेट्रोलचे भाव किती?

SCROLL FOR NEXT