पुणे

निसर्गाच्या सानिध्यात वसलेले सालचे मंदिर

CD

घोडेगाव, ता. १ : साल (ता. आंबेगाव) येथील ग्रामदैवत स्वयंभू सिद्धेश्‍वर मंदिर मंचरहून भीमाशंकर मंदिराकडे जाताना घोडेगाव पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात वसलेले आहे. मंदिरात श्रावण महिन्यात श्रीराम विजय ग्रंथाचे वाचन सुरू आहे. या काळात भाविकांची दर्शनासाठी रांग असते. मंदिराला नुकताच ‘क’ तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्याने विकासकामासाठी निधी प्राप्त होणार आहे. मंदिरात स्वयंभू शिवलिंग, भगवान शंकर बहिरोबा रूपाने देवी पार्वती, माता जोगेश्‍वरी आणि मुख्य सेनापती काळभैरव मूर्ती आहे. येथील स्वयंभू शिवलिंग नवसाला पावणारे, भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारा असा नावलौकिक आहे. मंदिराच्या पश्‍चिमेला पांडवकालीन गड, नारायण लेणी त्यात पुरातन मूर्ती शिवलिंग लेणीच्या बाहेर न्हाणपोडी आहे.

मंदिराजवळ पर्यटन स्थळे -
- मंदिरापासून ६ किलोमीटरवर आयुकाची खगोल दुर्बीण गिरवलीजवळ आहे.
- नारोडी येथे संत ज्ञानेश्‍वर, संत मुक्ताबाई यांची मंदिरे घोडनदी तीरावर आहे.
- रांजण खळगे
- श्री क्षेत्र भीमाशंकर ५० किलोमीटर अंतरावर

सोई सुविधा -
- पार्किंगची सुविधा
- दर्शनासाठी स्वयंशिस्त रांग
- जवळच ग्रामीण रूग्णालय
- अभिषेकासाठी भरपूर जागा
- सीसीटीव्हीची सोय
- पिण्यासाठी शुद्ध पाणी

सुरक्षेसाठी संपर्क क्रमांक -
घोडेगाव पोलिस ठाणे - ०२१३३-२४४१३३
मोबाईल क्रमांक ९४२२४३२५१७

चारही श्रावणी सोमवारी नित्यपूजा, दर्शनाची व्यवस्था असते. महाशिवरात्रीला कीर्तन सोहळा, सप्ताह असतो. लवकरच भक्तनिवासाचे काम सुरू करणार आहे.
बबनराव गव्हाणे, भरत गव्हाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan : मनोज जरांगे-पाटलांचे नेतृत्व संपवायचे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव

Pakistan Crisis: बापरे! पाकिस्तानात एका गॅस सिलिंडरची किंमत पोहचली ७ हजारांवर; कारण काय?

Sukanya Samruddhi Yojna : घरात तीन मुली आहेत? मग टेन्शन सोडा; जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांतर्गत कशी उभी राहील कोटींची संपत्ती!

Jailer 2 Box Office: रजनीकांत यांचा बॉक्स ऑफिसवर जलवा! १० दिवसांत जगभरात ६४१ कोटींची कमाई

पुढच्या सात दिवसांत ४ राशींचं नशीब चमकणार! धनलाभासह करिअरमध्ये प्रगतीचे योग

SCROLL FOR NEXT