पुणे

घोडेगावात पुरातून तीन नागरिकांची सुटका

CD

घोडेगाव, ता. २० ः घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील घोडनदी काठावर असलेल्या स्मशानभूमीत बुधवार रात्री (ता. २०) पुराचे पाणी घुसल्याने तीन नागरिक पाण्यात अडकले होते. स्थानिक निसर्ग साहस रेस्क्यू पथक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना पाण्यातून बाहेर काढले.
सोमनाथ मुकणे यांनी घोडेगाव पोलिस ठाणे येथे येऊन स्मशानभूमीतील पुराच्या पाण्यात काही नागरिक अडकल्याची माहिती दिली होती. त्यानुसार निसर्ग साहस रेस्क्यू पथकाचे धनंजय कोकणे यांच्या मदतीने बोट, लाइफ जॅकेट व दोरीचा वापर करून अडकलेल्या सुनीता सोमनाथ मुकणे (वय ४६), मंदा अनिल वाघ (वय ४५), अनिल भिवा वाघ (वय ५०) यांना सुखरूप बाहेर काढले.
या बचाव कार्यावेळी तहसीलदार संजय नागटिळक, खेड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मांडवे, घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर पवार, यांच्यासह निसर्ग साहस संस्थेचे अध्यक्ष धनंजय कोकणे, आपदा मित्र मिलिंद भांगरे, राम फलके, अमोल वाघमारे, किरण शिंगाडे, किशोर वाघमारे उपस्थित होते.

04168

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump यांचा मोठा निर्णय! व्हिसा मुलाखती अनिश्चित काळासाठी स्थगित; अमेरिकेच्या प्रवासाची तयारी करणाऱ्या लाखो अर्जदारांना फटका

आजचे राशिभविष्य - 26 ऑगस्ट 2026

विशेष : सागरी क्षेत्रात करिअरच्या संधी

भविष्यवेध : एआय, डेटा सायन्स, मशिन लर्निंग की सीएस आयटी?

Startup Stipend Scheme: स्टार्टअप सुरू करण्याची मोठी संधी; दरमहा १५ हजारांचे मानधन, ७.५ लाखांची मार्केटिंग मदत, पेटेंट खर्चही सरकार देणार

SCROLL FOR NEXT