पुणे

एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचा अहवाल सादर

CD

घोडेगाव, ता. २८ : ‘‘घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत असणाऱ्या २३ शासकीय आश्रमशाळा व २४ शासकीय वसतिगृह येथील मुलींच्या वसतिगृहातील मुलींची कोणत्याही प्रकारची गर्भतपासणी चाचणी करण्याचे आदेश या कार्यालयातून संबंधित तपासणी करणाऱ्या जिल्हा रुग्णालयाला दिलेले नाहीत. यात फक्त संसर्गजन्य आजारांसंबंधी तपासण्या केल्या जाव्यात, असे पत्र दिले आहे. प्रसारमाध्यमातून येणाऱ्या बातम्या चुकीच्या पद्धतीने आलेले आहेत,’’ असा खुलासा एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प प्रमुख प्रदीप देसाई यांनी जिल्हा माहिती अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिली आहे.

पुणे शहरातील वाकड येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींना प्रवेश घेण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करताना गर्भतपासणी (यूपीटी टेस्ट) करावी लागते. ही तपासणी करण्यासाठी विद्यार्थिनीची अथवा त्यांच्या पालकांची पूर्वपरवानगी घेतली जात नाही, अशा आशयाची बातमी सोशल मीडियाच्या प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध झाली आहे. या बातमीच्या अनुषंगाने वस्तुस्थितिदर्शक अहवाल प्रकल्प कार्यालयाने सादर केला आहे. या अहवालात म्हटले आहे की, प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात एकूण २३ शासकीय आश्रमशाळा व २४ शासकीय वसतिगृह असून, २४ वसतिगृहांपैकी मुलींची ११ वसतिगृह कार्यरत आहेत.
मुला-मुलींच्या वसतिगृह प्रवेशाच्या वेळी आदिवासी विकास विभाग प्रवेशापूर्वी विद्यार्थ्यांच्या (मुले/मुली) आरोग्य तपासणी शासकीय रुग्णालयाकडून करण्यात यावी. इतर विद्यार्थ्यांना बाधा होईल, असे संसर्गजन्य आजार अथवा गंभीर आजार असलेल्या मुलांना प्रवेश देण्यात येऊ नये, असे नमूद केलेले असते. तथापि यामध्ये यूपीटी टेस्टबाबत कोणतेही निर्देश किंवा सूचना दिलेल्या नाहीत.
वसतिगृह प्रवेश देण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या (मुले-मुली) आरोग्याची तपासणी होण्याबाबत अधिष्ठाता ससून रुग्णालय पुणे व अधिष्ठाता सिव्हिल हॉस्पिटल, औध पुणे यांना पत्राद्वारे सूचना केलेली असते. परंतु गर्भतपासणी (यूपीटी टेस्ट) याबाबत कुठेही नमूद केलेले नाही.
वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केल्यानंतर वैद्यकीय प्रमाणपत्राचा नमुन्यामध्येदेखील यूपीटी टेस्टचा उल्लेख नाही. या प्रमाणपत्रात मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असा उल्लेख आहे.

परंतु आश्रमशाळा अधीक्षक अथवा अधिक्षिका यांच्या स्वतंत्र जबाबदाऱ्यांमध्ये मुलींचे मासिक पाळी रजिस्टर अद्ययावत ठेवतात. त्यानुसार मुलींचे गोपनीय रजिस्टर आश्रमशाळेतील अधिक्षिका ठेवतात. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्याची काळजी घेण्यासाठी सर्व आश्रमशाळांच्या ठिकाणी ANM नर्स कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या आहेत. तसेच आश्रमशाळेतील व वसतिगृहातील विद्यार्थी, विद्यार्थिनींची वैद्यकीय फिरते आरोग्य पथक यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करून घेतली जाते.

कार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचारी, महिला कर्मचारी तसेच स्वयंसेवी संस्था या देखील या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील आश्रमशाळांना व वसतिगृहांना भेटी देतात. परंतु भेटीच्या वेळी कोणत्याही विद्यार्थिनीने याबाबत तोंडी अथवा लेखी तक्रार केलेली नाही, तसेच सर्व आश्रमशाळांच्या ठिकाणी विशाखा समिती व शाळा व्यवस्थापन समिती कार्यान्वित आहे. या समितीमार्फतही या प्रकरणाबाबत कुठलीही लेखी अथवा तोंडी तक्रार या कार्यालयास प्राप्त नाही. या प्रसारित बातम्यांमुळे शासनाची नाहक बदनामी झाली आहे. या बातमीचा खुलासा करण्याचे आवाहन त्यांनी पत्राद्वारे केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: ''भारत-चीनने एकत्र येणं गरजेचं'', जपानमधून मोदींचा ट्रम्प यांना थेट मेसेज

Crime News : 'अश्लील रील्स बनवणं बंद कर' म्हटल्याने संतापली पत्नी... पतीवर चाकूने केला हल्ला...धक्कादायक घटना समोर

Maratha Protest: आंदोलकांसाठी आझाद मैदानात महापालिकेचा पुढाकार; पिण्याचे पाणी, शौचालयासह अनेक सुविधा उपलब्ध

Latest Maharashtra News Updates live: मुंबई पूर्व द्रुतगती मार्गावर ट्रॅफिक जाम, वाहनांच्या लांबच लांब रांगा

सोनू सूदने केला स्टार प्लसच्या नवीन शो 'संपूर्णा'चा ट्रेलर लॉन्च

SCROLL FOR NEXT