घोडेगाव, ता. ३१ ः घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बी. डी. काळे महाविद्यालय, जनता विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय, तसेच व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच जनता विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयात सहावे रानभाज्या व रानफळे प्रदर्शनाचे आयोजन केले होते. यामध्ये ५० रानभाज्या व खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते. या प्रदर्शनामध्ये सामूहिक १७२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या प्रदर्शनाचे उद्घाटन घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर पवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष तुकाराम काळे हे होते.
या प्रदर्शनात चाव्याचा बार, कर्टुली, रताळ्याच्या कोवळ्या पानाची भाजी, डांगर भोपळ्याची भाजी, डांगर भोपळ्याच्या कोवळ्या पानांची भाजी, तांदुळजा, कुर्डू, लाल माठाच्या पानांची भाजी, लाल माठाच्या देठाची भाजी, पुदिन्याची भाजी, आळूच्या वड्या, कोथिंबिरीच्या वड्या, सुरण भाजी, वाफवडे, वाफ वड्याची रस्सा भाजी, कौदर भाजी, राणी केळीची भाजी, शेवग्याच्या पानांची भाजी, शेवग्याच्या पानाचे पराठे, शेंगोळे, तोंडलीची भाजी, सायरधोंड्याची भाजी, भोकराची भाजी, भोकराच्या कोवळ्या पानांची भाजी, पाथरीची भाजी, वाळवलेल्या भोकराची भाजी, खुरसण्याच्या पानाची भाजी, खुरसण्याची चटणी, जवसाची चटणी, लसूण चटणी, काळे वाटाण्याचा रस्सा, आयुर्वेदिक चहा, गवती चहा, पेरूच्या पानांचा चहा, गुळवेल, कोरफड, आर्वी, चिंचुरड्याची भाजी, आर्वी कंदाची भाजी रानभाज्या शिजवलेल्या स्वरूपात स्टॉलवर उपलब्ध असल्याने खवय्यांनी खरेदी करून रानभाज्याचा मनसोक्तपणे आस्वाद घेतला.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. संजय आर्वीकर, कार्याध्यक्ष सुरेश काळे, सचिव विश्वास काळे, प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर वाल्हेकर, प्रशांत काळे, मुकुंद काळे, सोमनाथ काळे, अधिकारी, व्यापारी, शेतकरी, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ शैक्षणिक संकुलातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी .मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विज्ञान विभागाच्या समन्वयिका प्रा. अर्चना औताडे यांनी केले. डॉ. माणिक बोराडे व अधिक्षक गणेश काळे यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब गव्हाळे यांनी आभार मानले.
रानभाज्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड
प्रदर्शनामध्ये अमरकंद, आघाडा, चाव्याचा बार, काटेमाठ, कुर्डू, कोळ, कवंदर,खुरासणी, घोळ, चवळीचे बोके, चिंचोडी टाकला,अळू, तांदुळजा, देठ, पाथरी, सापकांदा, बडदा, बोंजरा, भारंगी, भुई, आवडी, भोपळ्याची फुले, रानकंद, भोकर, सायरीचे दोडे, रानकेळी, तोंडली, भोपळा, रुई, वाघोटी, शेवग्याची फुले, सुरण, कडूकंद, कुडा, कोळशाचा मोहर, अनवे, कळकिंदा, तालीमखाना, कौला, गोमाटी, चाईवळ, चिवळी, टेंभरण, तरोटा, फांग, पिताना, कोरसी, बडकी, बहावा, तोंडे आदी कच्च्या रानभाज्या स्टॉलवर विक्रीसाठी उपलब्ध होत्या. या रानभाज्या खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती.
आजच्या समाजाची जीवनशैली बदलत चालली आहे. पूर्वजांची जीवनशैली आदर्शवत होती. फॅशनच्या नावाखाली आज फुडमॉल वाढत आहे. फास्टफुडचा वापर केला जात आहे. रंग, पावडर, रसायन मिश्रित पदार्थ आज वापरले जात आहे. निसर्गातून निर्माण झालेल्या रानभाज्या व रानफळे आरोग्यासाठी पोषक आहे. निसर्गनिर्मित रानभाज्या व रानफळांचा दैनंदिन जीवनात वापर वाढला पाहिजे. संस्थेचा रानभाज्या व रानफळांचे प्रदर्शन आयोजित करण्याचा हा एक स्तुत्य उपक्रम आहे.
- सागर पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक, घोडेगाव पोलिस ठाणे
04210
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.