चंद्रकांत घोडेकर : सकाळ वृत्तसेवा
घोडेगाव, ता. १९ : घोडेगाव (ता आंबेगाव) येथे पशुधन विकास अधिकारी पद रिक्त आहे. तसेच भौतिक सुविधांची वाणवा आहे. त्यामुळे उच्च श्रेणीचा पशुवैद्यकीय दवाखाना येथे सुरू करावा, अशी मागणी परिसरातील पशुपालक करीत आहेत.
पशुवैद्यकीय दवाखान्यातर्फे घोडेगाव, धोंडमळा शिंदेवाडी, कोलदरे, गोनवडी, काळेवाडी, दरेकरवाडी, आंबेगाव गावठाण, कोळवाडी, कोटदरमळा इत्यादी गावांमध्ये सेवा दिली जाते. परिसरात अंदाजे २५०० पशुधन असून, त्यात गोवर्ग, म्हैसवर्ग तसेच शेळी व मेंढ्यांचा समावेश आहे.
दरम्यान, पशुधन विकास अधिकारी हे पद रिक्त असून दवाखान्याचा अतिरिक्त कार्यभार १४/११/२०२५ पर्यंत डॉक्टर वसंत वाळुंज यांच्याकडे होता. अलीकडेच कार्यभार हा हस्तांतरित झाला असून, डॉक्टर नचिकेत जयवंत कठाळे हे प्रभारी पशुधन विकास अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. येथे गीताबाई दगडे या परिचर पदावर कार्यरत आहेत.
एप्रिल ते ऑक्टोबर २०२५ ची स्थिती
कृत्रिम रेतन........५५
वंध्यत्व निर्मूलन........३६
लसीकरण
लंपी........१४००
लाळ्या........८५०
घटसर्प........७००
फऱ्या........१००
वैरण बियाणे वितरण
मका .....१०० किलो
वार्षिक चारा उत्पादन (टनांत)
हिरवा चारा..........६१०००
वाळलेला चार............३००० टन
परिसरात आढळणारे प्रमुख पशुरोग
- चयापचयाचे आजार
- मस्टायटिस
- प्रोटोझोअल डिसीजेस
यांची आहे गरज
सुसज्ज इमारत
एक्स-रे,
सोनोग्राफी,
हिमेटलॉजी
घोडेगाव येथे तालुका लघु पशुसर्व चिकित्सालय हे प्रस्तावित आहे. तो चांगल्या जागे अभावी प्रलंबित आहे. त्यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे. काही पशुपालकांमध्ये लसीकरणाविषयी उदासीनता दिसून येते. आजार उद्भवल्यास पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे पशुपालकांनी शासनातर्फे दिले जाणारे लसीकरण करून घ्यावे.
- डॉ. नचिकेत जयवंत कठाळे, प्रभारी पशुधन विकास अधिकारी
04479