पुणे

घोडेगावात शेळ्या, मेंढ्यांचे बावीस पशुपालकांना वाटप

CD

घोडेगाव, ता. २९ : घोडेगाव (ता आंबेगाव) येथे आंबेगाव तालुक्यातील निवड झालेल्या २२ पशुपालक लाभार्थ्यांना शेळी व मेंढीचे वाटप करण्यात आले.
पंचायत समिती आंबेगाव व महाराष्ट्र राज्य शेळी महामंडळ यांच्या समन्वयातून हा कार्यक्रम पार पडला.

महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत आदिवासी उपयोजना, अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत १० + एक शेळी, मेंढीकट वाटप करण्यात आले.
निवड झालेल्या लाभार्थ्यांनी स्वहिस्स्याची रक्कम डिसेंबर २०२४ महिन्यात डीडीद्वारे भरली. मात्र, स्वहिस्स्याची रक्कम भरून वर्ष व्हायला आले तरी लाभार्थ्यांना पशुधनाचे वाटप न झाल्याने शेतकरी चिंतेत होते. दरम्यान, निवड झालेल्या अनेक लाभार्थ्यांनी स्वहिस्सा भरण्यासाठी घरातील सोने तारण ठेवून कर्ज घेतले होते. त्याचे व्याज ते भरत असून मात्र अजूनही पशुधन मिळाले नव्हते. पशुधन वाटपाचे नियोजन झाले नाही. मात्र जनवादी युवा संघटनेच्या वतीने पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन आंबेगाव पंचायत समितीच्या सहाय्यक गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे, व पशुधन विकास अधिकारी पी. डी. साळवे यांना देण्यात आले होते. त्यानंतर त्वरित शेळ्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी साळवे व जनवादी युवा संघटनेचे आंबेगाव तालुका सहसचिव किरण दगडे तसेच लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.

04519

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tarique Rahman : तारिक रहमान - डार्क प्रिन्स, भ्रष्टाचाराचे आरोप, तुरुंगवास, मृत्यूदंडाची शिक्षा, लंडनला पलायन अन् आता बांगलादेशचे संभाव्य पंतप्रधान!

T20 World Cup : यूएईचा थरारक विजय अन् अफगाणिस्तानचे स्पर्धेतील पॅकअप जवळपास निश्चित! ड गटात मोठी उलथापालथ

Mumbai Goa: कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-गोवा महामार्गाचे चार पदरी काम कधी पूर्ण होणार? नवीन तारीख आली समोर

IND vs PAK : भारत-पाकिस्तान लढतीवर अनिश्चिततेचं सावट! श्रीलंकेने जाहीर केले धक्कादायक अपडेट्स, सामना न झाल्यास...?

मंत्र्याने दिलेल्या घराची कॉन्ट्रोव्हर्सी ते लॉकडाउनमध्ये केलेलं लग्न; मराठमोळी सोनाली कुलकर्णी सध्या कुठे गायब आहे?

SCROLL FOR NEXT