पुणे

आदिवासींवर बेघर होण्याची वेळ

CD

घोडेगाव, ता. १० : आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरण परिसरातील जलसंपदा विभागाच्या जागेवर गेल्या ४० वर्षांपासून आदिवासी कातकरी-ठाकर बांधव राहत आहेत. त्यांना अतिक्रमित जागा खाली करण्यास महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या डिंभे धरण विभागाने १५ दिवसांची नोटीस दिली आहे. त्यामुळे ही कुटुंबे बेघर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निषेध नोंदवत आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत पक्षाचे कार्याध्यक्ष प्रकाश घोलप यांनी याबाबत घोलप यांनी तहसीलदारांकडे लेखी केली आहे. याबाबत ते म्हणाले, ‘‘आदिवासी बांधवांना या जागेवरून बेदखल केल्यास ती बाब अमानवीय ठरेल. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पुढाकाराने पिंपळगाव, फुलवडे आणि शिनोली येथील बेघर कातकरी बांधवांना घरासाठी जागा मिळाली आहे. इतर भागातील बांधवांसाठीही उपाययोजना सुरू आहे. त्यामुळे या कुटुंबांना प्रशासनाने कायमस्वरूपी निवारा देण्याची जबाबदारी घ्यावी.’’
प्रवीण पारधी म्हणाले, ‘‘याबाबत १५ डिसेंबर रोजी दुपारी ११ वाजता घोडेगाव येथील तहसीलदार कार्यालय येथे संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यात प्रकाश घोलप यांच्यासह मारुती लोहकरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथ काळे, ग्रामपंचायतचे माजी सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. प्रशासन आदिवासी बांधवांना हक्काचा निवारा मिळवून देत नाही, तोपर्यंत त्यांना बेदखल करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. त्यामुळे नोटीस मागे घेऊन आदिवासी बांधवांना मदत करावी.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठवाड्याला मोठी भेट मिळणार! छत्रपती संभाजीनगर रेल्वेला स्वतंत्र विभाग करण्याची संसदेत मागणी; पर्यटन आणि उद्योगाला चालना येणार

Surat Fire : गुजरातच्या सुरतमध्ये टेक्स्टाईल मार्केटला भीषण आग, शेकडो दुकाने जळून खाक, कोट्यवधींचे नुकसान

हे फक्त पुण्यातच घडू शकतं! पादचारी पुलावर गाडी चालवणाऱ्यांची काकूंनी केली आरती, Viral Video

मद्यपान करताना बोटांनी तीन थेंब जमिनीवर का शिंपडतात? दारु पिणाऱ्या ९९ टक्के लोकांना खरं कारण माहिती नसेल...

Latest Marathi News Live Update : अंबादास दानवे यांच्या कॅशबॉम्ब प्रकरणात शेकापची उडी

SCROLL FOR NEXT