पुणे

डिंभे परिसरातील कुटुंबांना तात्पुरता दिलासा

CD

घोडेगाव, ता. ११ : डिंभे धरण परिसरातील जलसंपदा विभागाच्या जागेत तात्पुरता निवारा करून राहणाऱ्यांना कार्यकारी अभियंता डिंभे धरण उपविभागाकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. तात्पुरता निवारा करून राहणाऱ्या कातकरी- ठाकर, तसेच डिंभे लेबर कॉलनी येथे अनेक वर्षांपासून राहणाऱ्यांवर कारवाई करणार नसल्याचे कार्यकारी अभियंता डिंभे उपविभाग यांच्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सांगितले. मात्र, कायमस्वरूपी निवारा करण्यासाठी किती वेळ लागणार, याबाबत लेखी उत्तर देण्याचे त्यांनी टाळले.
अतिक्रमण केलेली जागा १५ दिवसांत खाली करण्याच्या नोटीस ३ डिसेंबर रोजी डिंभे धरण उपविभाग यांनी संबंधित ग्रामस्थांना दिल्या होत्या.
याबाबत आंदोलन करणार असल्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रवीण पारधी, प्रकाश घोलप यांनी मांडली होती. त्याबाबतचे पत्र देखील संबंधित सर्व कार्यालयांना दिले होते. त्याची दखल घेत प्रांत अधिकारी शिंदे यांनी बैठक आयोजित केली. त्यामध्ये बाधित असणाऱ्या लोकांनी बहुसंख्येने उपस्थिती दाखवली. घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे तहसील कार्यालयात प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे, कार्यकारी अभियंता अक्षय बरकले, उप अभियंता ए. एस. आदलिंगे, तहसीलदार डॉ. सचिन वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी प्रकाश घोलप, प्रवीण पारधी, संजय गवारी व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
डिंभे लेबर कॉलनी येथे धरण बांधताना बाहेर राज्यातून आलेले बांधव गेल्या ४०पेक्षा अधिक वर्षांपासून जलसंपदा विभागाच्या जागेत रहात आहेत. त्यांची मतदान कार्ड, आधारकार्ड, रेशन कार्ड हे डिंभे येथील आहेत. त्यांना घरासाठी जागा मिळावी, यासाठी १६ डिसेंबर रोजी पंचायत समिती आंबेगाव व तहसीलदार कार्यालय घोडेगाव यांच्या वतीने सर्वे करण्यात येणार असून, कुटुंबांची संख्या निश्चिती करण्यात येणार आहे. ज्यांना जलसंपदा विभागाने नोटीस दिल्या आहेत, त्यात फुलवडे व आंबेगाव येथील ठाकर समाजाच्या लोकांची नावे आहेत. त्यांना देखील कायमस्वरूपी घर बांधण्यासाठी जागा देण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना प्रांत अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. फळोदे येथील गायरान जागेत घरकुल बांधण्यासाठी एक एकर जागेची विनामूल्य मोजणी करून देण्याचे पत्र मोजणी अधिकाऱ्यांना देण्याच्या सूचना तहसीलदारांना प्रांत अधिकाऱ्यांनी केल्या.

येत्या गुरुवारी आढावा बैठक
कातकरी बांधवांना ते आता रहात असलेल्या ठिकाणी कायमस्वरूपी घरे बांधून देण्याच्या कार्यवाहीबाबत १८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता तहसीलदार कार्यालय घोडेगाव येथे आढावा बैठक आयोजित करण्याचे आदेश देखील या बैठकीत प्रांत अधिकारी शिंदे यांनी दिले. तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनीही तात्पुरता निवारा करून राहणाऱ्या लोकांसाठी कायमस्वरूपी निवारा देण्यासाठी शासकीय पातळीवर सुरु असणाऱ्या कार्यवाहीबाबत लेखी निवेदन कार्यकारी अभियंता डिंभा धरण उपविभाग यांना सादर करण्याच्या प्रांत अधिकारी शिंदे यांनी बैठकीत सुचित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Live Update: PNG गॅस आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या स्थितीबाबत उच्चस्तरीय आढावा बैठकीचे आयोजन

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT