पुणे

गटशिक्षणाधिकाऱ्यांचा केवळ शाळा भेटीचा दिखावा

CD

घोडेगाव, ता. १५ : आदिवासी भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी या भागात शनिवारी तीन पाहणी पथक पाठवले होते. हे पथक येणार याची माहिती सर्व शिक्षकांना अगोदरच मिळाल्याने शिक्षकांनी वेळेवर उपस्थित राहून शाळेचे काम केले. या भागातील शिक्षकांवर नजर ठेवून कारवाई होणार का याबाबत ग्रामस्थ आणि पालकांमध्ये चर्चा आहे.
आदिवासी भागातील शाळेच्या बाबत अनेक तक्रारी आहेत. यात जिल्हा परिषद शाळांतील शिक्षक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे आंबेगाव तालुक्याच्या पश्‍चिम आदिवासी भागामध्ये बहुतेक शिक्षक मुख्यालयात राहत नाहीत. शाळा उशिरा सुरू करणे, लवकर शाळा सोडणे, शिक्षकांची अनुपस्थिती याची पाहणी करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी आणि त्यांचे पथक शनिवारी सकाळी येणार असल्याची माहिती आदल्या दिवशीच शिक्षकांना मिळाल्याने आदिवासी पेसा भागातील शिक्षक वेळेवर हजर झाले. त्यामुळे गटशिक्षणाधिकाऱ्यांनी केवळ शाळा भेटीचा फार्स केल्याची चर्चा विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थांनी व्यक्त केली.
शुक्रवारी गटशिक्षणाधिकारी यांनी केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, कार्यालयीन कर्मचारी यांची बैठक घेतली. यामध्ये पेसा क्षेत्रातील शिक्षक वेळेवर शाळेवर येतात का? मुलांचा परिपाठ चांगला घेतात का? विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आदि कामाची पहाणी करण्यासाठी तीन पथके तयार केली. शनिवारी सकाळी शाळेतील शिक्षकांना कोणतीही कल्पना न देता भेट देण्याचं नियोजन ठरले. परंतु बैठकीमधून बाहेर येताच बैठकीत उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी लगेच संबंधित शिक्षकांना गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांच्या सह आम्ही शाळांना भेट देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे घोडेगाव, मंचर, खेड, पुणे येथील शिक्षक सकाळी लवकर शाळेत हजर झाले. शाळेला भेट देणाऱ्या पथकाचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. संबंधित पथक पुढील शाळेवर निघून गेले. मात्र पेसा भागातील शिक्षकांच्या बदल्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी मनमानी करत तोंडी आदेशाने सदन भागात केल्या. ते शिक्षक संबंधित पाहणी दौऱ्या दरम्यान शाळेवर हजर नव्हते.
याबाबत गटशिक्षणाधिकारी रूपाली धोका यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क झाला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati ST Bus Accident : अमरावतीत भीषण अपघात! एसटी महामंडळाच्या बसची ऑटोला धडक, पाच जणांचा मृत्यू, दोघे गंभीर...

19 February Holiday : 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या अधिकृत माहिती

मालिकेने निरोप घेताच नवी सुरुवात; लोकप्रिय मराठी अभिनेत्रीची लगीनघाई; ग्रहमखचे फोटो व्हायरल

Raj Thackeray Eknath Shinde Meeting : राज ठाकरेंनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट, राज्याच्या राजकारणात नवे समीकरण ? चर्चांना उधाण

PM Internship Scheme: PM इंटर्नशिप योजनेत मोठे बदल? विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार; जाणून घ्या नवे नियम

SCROLL FOR NEXT